मातंग समाजाच्या मुलांची धिंड प्रकरण, तक्रार मागे घेण्यासाठी पालकांवर दबाव?

सवर्णाच्या विहिरीत पोहल्याने मुलांची धिंड काढण्या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणाऱ्या पालकांवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव वाढत आहे.

Ajay Kautikwar
जळगाव,ता.14 जून : सवर्णाच्या विहिरीत पोहल्याने मुलांची धिंड काढण्या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणाऱ्या पालकांवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव वाढत आहे.मात्र सरकार खंबीरपणे पालकांच्या बाजूने राहिल असं आश्वासन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिलं आहे.या प्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची काळजी घेऊ असं आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं. हे प्रकरण सवर्ण किंवा दलित असं नसून आरोपी हेही अनुसूचित जमातींमधले आहेत अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली. समाजातील ही विकृती असून सर्वांनी मिळून अशा विकृतीविरूद्ध लढायला पाहिजे असंही पाटील म्हणाले.

एवढ्यावरच न थांबता त्यांची धिंडही काढली आणि घटनेचा व्हिडीओ काढून तो व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे.  

Trending Now