आता बोला !, पुणे महावितरण परिमंडळाचीच तब्बल 200 कोटींची थकबाकी

महावितरणच्या पुणे परिमंडळाकडची थकबाकी 200 कोटींच्या घरात गेलीय. आणि ही रक्कम एप्रिलपासूनची. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणलेत.

Sachin Salve
15 सप्टेंबर : सर्वसामान्यांच्या वीजबिलाचे १०० रुपये थकले तरी विज तोडण्याची कारवाई महावितरण करत असते. पण याच  महावितरण पुणे परिमंडळातील थकबाकी सुमारे २०० कोटींच्या घरात गेल्याचं समोर आलंय.विजेचं बिल भरायला कधी उशीर झाला असेल तर तुम्हाला अनुभव असेल की लगेच वीज तोडण्याची भीती दाखवली जाते. पण महावितरण हे सोयीनं करते की काय, असा प्रश्न निर्माण झालाय.याचं कारण असं, की महावितरणच्या पुणे परिमंडळाकडची थकबाकी 200 कोटींच्या घरात गेलीय. आणि ही रक्कम एप्रिलपासूनची. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणलेत. मुख्यालयातून तसा फर्मानच निघालाय. थकबाकी वसुलीला प्राधान्य देण्याचे आदेश ऊर्जा मंत्रालयातून दिले गेलेत. पण ही रक्कम इतकी फुगेपर्यंत महावितरण झोपलं होतं का, असा सवाल नागरिक करतायत.

Trending Now