नाशिकमध्ये भाजप विरुद्ध आयुक्त, तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल

नाशिक पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

नाशिक, 27 ऑगस्ट : नाशिक पालिकेत नगरसेवक विरुद्ध आयुक्त असा संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. कारण नाशिक पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सत्ताधारी भाजपच्या सभागृह नेत्यांनी नगरसचिवांना यासंबंधी पत्र दिलं आहे. आयुक्त हेकेखोर, मनमानी आणि हुकूमशाही पध्दतीनं काम करीत असल्याचा आरोप तुकाराम मुंडे यांच्यावर करण्यात आला आहे. या अविश्वास प्रस्तावाची प्रत ही नाशिक महापौर रंजना भानसी यांच्याकडेही देण्यात आली आहे.यासंबंधी तयार करण्यात आलेल्या पत्रकावर उपमहापौर, स्थायी समिती सभापतींसह स्थायीच्या 15 सदस्यांची स्वाक्षरी करण्यात आली आहे. भाजपसोबत सर्वपक्षीय नगरसेवक आयुक्तांच्या विरोधात आहे. त्या सर्वांनी तुकाराम मुंडे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव महापौरांकडे सोपवलं आहे.दरम्यान, स्थायीच्या अविश्वास प्रस्तावाची प्रत माझ्याकडे आली असल्याचं महापौर रंजना भानसी यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं आहे. अवास्तव करवाढ केल्याच्या  मुद्द्यावरून आयुक्तांवर सर्व नाराज आहे. त्यामुळे यासगळ्यावर बैठक बोलावणार आहे. या या बैठकीत, विशेष महासभा बोलावण्याचा निर्णय घेणार असल्याचंही रंजना भानसी म्हणाल्या आहेत.

अखेर आम्ही नाशिककरांसोबत आहोत. तुकाराम मुंडेंनी नगरसेवकांची कामं थांबवली. ते हुकूमशहा आहेत असा आरोप रंजना यांनी केला आहे. या प्रस्तावाला सर्व पक्षीय नेत्यांची मंजूरी असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.आयुक्त तुकाराम मुंडे मनमानी कारभार करतात म्हणून त्यांच्याविरोधात हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आता नियोजित बैठकीत काय निर्णय घेण्यात येणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. PHOTOS : उदयनराजेंचा नादखुळा, शहरात चालवला कचऱ्याचा डंपर !  

Trending Now