जितेंद्र आव्हाडांनी घेतली अरूण परेरांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज अरूण परेरा यांची त्यांच्या घरी जावून भेट घेतली.

ठाणे, ता. 30 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज माओवादी समर्थक म्हणून  घरातच स्थानबद्द असलेले अरूण परेरा यांची त्यांच्या घरी जावून भेट घेतली. पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती, मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना त्यांच्याच घरी स्थानबद्द करण्यात आलंय. अटकेतले सर्व कार्यकर्ते हे नक्षलसमर्थक असतील मात्र ते नक्षलवादी नाहीत असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. ज्यांना अटक केली होती त्यांच्या कुटूंबियांची घरी जावून भेट घेणार असल्याचंही ते म्हणाले होते. त्यानंतर आज आव्हाड यांनी परेरांच्या घरी जावून भेट घेतली. या आधी काही व्हिडीओ व्हायरल झाल्याने सुरवातीला आव्हाड यांच्या भेटीवरून संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र नंतर आव्हाड यांनी भेटीचा फोटो ट्विट करून परेरा यांची भेट झाल्याचं स्पष्ट केलं.कोण आहेत अरूण परेरा?

Trending Now