परेरांच्या कुटुंबियांनी भेट नाकारली, पण आव्हाडांनी आव आणला भेट झाल्याचा!

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे अरूण परेरा यांच्या कुटूंबियांची भेट घेण्यासाठी गेले मात्र कुटूंबियांनी त्यांची भेट नाकारली.

ठाणे,ता. 30 ऑगस्ट : नक्षलसमर्थक म्हणून अटक झालेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचं घेण्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं होत. साहेबांनी आदेश दिल्यावर त्याची अमंलबजावणी केली नाही ते शिलेदार कसले? साहेबांचा आदेश असल्याने ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अरूण परेरा यांचं आज घर गाठलं. ठाण्यातील चरई भागात शेरॉन नावाच्या इमारतीत अरूण परेरा राहतात. आपल्या कार्यकर्त्यांसह आव्हाड परेरा यांच्या घरी गेले. ते दारासमोर उभे राहून त्यांनी भेटीसाठी आलो असल्याचं संगितलं. पण परेरा यांच्या कुटूंबियांनी त्यांना काहीही प्रतिसाद दिला नाही. जितेंद्र आव्हाडांना आल्या पावली परत जावं लागलं. ही सगळी दृश्य मोबाईलमध्ये कैदही झाली. मात्र इमारती खाली आल्यावर आव्हाडांनी भेटीचा असा काही आव आणला की पत्रकारही अचंबित झाले.जी भेटच झाली नाही त्यावर आव्हाडांनी असं सांगितलं की कुटूंबियांची भेट घेतली. आपण निर्दोष असल्याचं कुटूंबियांनी सांगितलं. पोलिसांनी बनाव करून अटक केली असं कुटूंबियांचं म्हणणं होतं असं आव्हाडांनी सांगूनही टाकलं. मात्र मोबाईलचं फुटेज बाहेर आल्यावर ती भेट झालीच नाही असं स्पष्ट झालं पण आव्हाडांनी मात्र भेट घेतल्याचा दावा केला.कोण आहेत अरूण परेरा?

VIDEO : चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये दोन तरुणींचा दारू पिऊन धिंगाणा

 

Trending Now