आज घटस्थापना; देवीच्या दर्शनास भाविकांची गर्दी

कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिरातही नऊ दिवस नवरात्रीचा जागर केला जातो. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी पहिल्यांदाच रोषणाईसाठी एलईडी बल्बचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे नवरात्र उत्सव अजूनच खुलणार आहे.

Chittatosh Khandekar
20 सप्टेंबर: आज घटस्थापना, राज्यभरात पुढचे नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. त्यामुळे उत्साहाचं वातावरण असतं. अनेक घरांमध्ये घटही बसवले जातात. आज देवीच्या दर्शनास सकाळपासूनच भाविकांनी रांगा लावल्या आहेत.कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिरातही नऊ दिवस नवरात्रीचा जागर केला जातो. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी पहिल्यांदाच रोषणाईसाठी एलईडी बल्बचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे नवरात्र उत्सव अजूनच खुलणार आहे. तसंच मंदिरांची नगरी नाशिकमध्येही नवरात्रीची तयारी पूर्ण झालीये.तर दुसरीकडे तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरूवात होते आहे. याच नवरात्र उत्सवासाठी मंदिर समिती ही सज्ज झाली असून मंदिर समितीकडून मंदिरात आकर्षक विद्यूत  रोषणाई करण्यात अली आहे . तुळजाभवानी देवीच्या मंदिरावर विविध रंगाच्या प्रकारच्या बल्ब्सनी आकर्षक पद्धतीने रोषणाई केली असून छत्रपती शिवाजी महाराज हे घोड्यावर येतानाचा देखावा केला आहे . त्याच बरोबर आई राजा उदो उदो , जय भवानी जय शिवाजी या घोषणा रोषणाईत करण्यात आल्या आहेत मंदिरातील शहाजी राजे प्रवेश द्वारा पासून ते ते देवीच्या मंदिर असलेल्या शिखरावर,मंदिरातील पायऱ्यांच्या बाजूला गोमुख तीर्थवरती असो किंवा गोंधळ कट्टा या सगळयांच्यावरती  विद्यूत  रोषणाई करण्यात आली आहे. मनमोहक आकर्षक रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे .

तर पुण्यात नवरात्र उत्सवासाठी महालक्ष्मी मंदिराची सजावट सुरू आहे. सारसबाग जवळील महालक्ष्मी मंदिर हे भाविकांच श्रध्दास्थान आहे. लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यंदा मंदिरात शिश महालाची सजावट करण्यात आली आहे. राजस्थानच्या कारागिरांनी हि सजावट केली आकर्षक सजावट आणि प्रकाशयोजना यामुळे मंदिर सुंदर आणि प्रसन्न दिसत आहे.एकंदर राज्यभर नवरात्रीचा उत्साह आहे. आता नऊ दिवस स्त्रीशक्तीचा जागर राज्यभर करण्यात येणार आहे.

Trending Now