अविश्वास प्रस्तावाला मी सामोरे जाईन, पण मला पाहिजे बोलण्याची संधी - तुकाराम मुंढे

नाशिक पालिकेत नगरसेवक विरुद्ध आयुक्त अशा पेटलेल्या संघर्षात पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक पाऊल मागे घेतलं आहे.

प्रशांत बाग, प्रतिनिधीनाशिक, 27 ऑगस्ट :  नाशिक पालिकेत नगरसेवक विरुद्ध आयुक्त अशा पेटलेल्या संघर्षात पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक पाऊल मागे घेतलं आहे. अवास्तव करवाढ केल्यामुळे नाशिकच्या सर्वपक्षीय नेत्यांनी तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर आता माघार घेत ही करवाढ पुन्हा कमी करण्यात आली आहे. 3 पैशांवरून 40 पैसे करवाढ करण्यात आली होती ती आता पुन्हा कमी करत 40 पैसे वाढ रद्द करण्यात आली आहे.दरम्यान, मी कायद्याचा सेवक आहे, मी हुकूमशहा नाही आहे. मी कधीही सभागृहाचा अवमान केला नाही. मात्र, महासभेत मला दोन वेळा बोलूच दिलं नाही हा माझा अपमान आहे असं तुकाराम मुंढे म्हणाले आहेत. माझ्याविरोधात लोकांना मिसगाईड केलं जात आहे. घरपट्टी 3000 वरून 23 हजार केली, हा आरोप खोटा आहे. ती नोटीस थकबाकीदार फ्लॅटधारकाची होती. त्यामुळे माझ्या विरोधात लोकांना चुकीचं सांगितलं जात असल्याचा आरोपा तुकाराम मुंढे यांनी केला आहे. अविश्वास प्रस्तावावर 31 ऑगस्टला होणाऱ्या विशेष महासभेसाठी मी तयार आहे. अविश्वास ठरावाला सामोरे जाण्यासाठी माझी तयारी आहे फक्त मला बोलण्याची संधी दिली पाहिजे असं तुकाराम मुंढे म्हणाले आहेत.

नाशिकमध्ये भाजप विरुद्ध आयुक्त, तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखलमाझ्याविरोधातल्या अविश्वास प्रस्तावाला मी सामोरं जाईन असं प्रखरपणे म्हणत मला बोलण्याची संधी पाहिजे असा मुद्दाही ठामपणे तुकाराम मुंढे यांनी मांडला आहे. अखेर रेटेबल व्हॅल्यू ठरवणं हा आयुक्तांचा अधिकार आहे. पण या करवाढीत दुरुस्ती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.पण जर विकास हवा आहे तर पैसादेखील हवा आहे असंही तुकाराम मुंढे म्हणाले आहे. मला दोन वेळा सभागृहात बोलू दिलं नाही, माझं बोलणं ऐकून न घेता माझ्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडणं म्हणजे माझा अपमान असल्याचंही ते म्हणाले आहेत.दरम्यान, नाशिक पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सत्ताधारी भाजपच्या सभागृह नेत्यांनी नगरसचिवांना यासंबंधी पत्र दिलं आहे. आयुक्त हेकेखोर, मनमानी आणि हुकूमशाही पध्दतीनं काम करीत असल्याचा आरोप तुकाराम मुंडे यांच्यावर करण्यात आला आहे. या अविश्वास प्रस्तावाची प्रत ही नाशिक महापौर रंजना भानसी यांच्याकडेही देण्यात आली आहे.यासंबंधी तयार करण्यात आलेल्या पत्रकावर उपमहापौर, स्थायी समिती सभापतींसह स्थायीच्या 15 सदस्यांची स्वाक्षरी करण्यात आली आहे. भाजपसोबत सर्वपक्षीय नगरसेवक आयुक्तांच्या विरोधात आहे. त्यामुळे यासगळ्यावर बैठक बोलावणार आहे. या या बैठकीत, विशेष महासभा बोलावण्याचा निर्णय घेणार असल्याचंही रंजना भानसी म्हणाल्या आहेत. PHOTOS : लॅक्मे फॅशन वीकमध्ये आयोजकांनी केली हेमामालिनींची बोलती बंद

Trending Now