हिना गावित यांच्यानंतर नंदुरबारमध्ये आयपीएस अधिकाऱ्यावर विद्यार्थ्यांचा हल्ला

नंदुरबार, 06 आॅगस्ट : खासदार हिना गावित यांच्या गाडीवर मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलकांनी गाडीवर चढून तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच आता आदिवासी विद्यार्थ्यांनी एका आयएस महिला अधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला केला. विद्यार्थ्यांनी गाडीवर चढून तोडफोड केली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वानमंती सी या गाडीत होत्या.आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात डीबीटी योजना सुरू करण्यात आलीये. मात्र विद्यार्थ्यांचा याला विरोध होता. याच विरोधात आज विद्यार्थ्यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयाबाहेर आंदोलन केलं.यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी वानमंती सी यांच्या गाडीला टार्गेट केलं. विद्यार्थ्यांनी वानंमती सी यांच्या गाडीवर चढून गाडीच्या काचा फोडल्या. यावेळी गाडीत वानंमती सी होत्या. काही आंदोलक विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाहनावर चढून तोडफोड केली. तिथे उपस्थितीत असलेल्या पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांच्या गराड्यातून त्यांना बाहेर काढलं. या तोडफोडीत गाडीच्या काचा फुटला आणि गाडीचे नुकसान झालं.

-------------------------------------------हेही वाचाVIDEO : लोकसभेतलं हिना गावितांचं संपूर्ण भाषण

शनाया घेणार गुरूचा कायमचा निरोप

VIDEO :हिना गावित यांच्यावर हल्ल्याबद्दल मराठा आंदोलक म्हणतात...

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Trending Now