नांदेडमधले शेतकरी जाणार संपावर

नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची तयारी केलीये.

Sonali Deshpande
09 एप्रिल : शेतकरी संपाचं लोण आता नांदेडपर्यंत पोहचलंय. नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची तयारी केलीये.संपाच्या पूर्वतयारीसाठी झालेल्या बैठकीला अर्धापूर तालुक्यातल्या अनेक गावातील शेतकरी उपस्थित होते. या बैठकीत संपाची रणनीती ठरवण्यात आलीये. 15 मे पासून 31 मेपर्यंत दूध, भाजीपाला आणि धान्य शहरात विकणार नसल्याचं शेतकऱ्यांनी ठरवलंय. शिवाय 7 जूनला शेतकरी क्रांती मोर्चा काढणार असल्याचंही शेतकऱ्यांनी निश्चित केलंय. सात जूननंतर पेरणी बंद आंदोलन केलं जाणार आहे.

Trending Now