नालासोपारा स्फोटक प्रकरणी एटीएसने समोर आणली धक्कादायक माहिती

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधीमुंबई, 09 सप्टेंबर : नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी एटीएस पथकाने ताब्यात घेतलेल्या वासुदेव सूर्यवंशी आणि विजय लोधी यांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. जळगावच्या साकळीमधून वासुदेव सुर्यवंशी याला एटीएसने ताब्यात घेतलं होतं. वासुदेव सूर्यवंशी सनातनचा साधक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वासुदेवच्या घराची तपासणी केल्यानंतर एटीएसकडून ही कारवाई करण्यात आली होती.तर विजय लोधीकडून ३ गावठी बॉम्ब, २ मोबाईल, २ कार नंबर प्लेट, ४ पेन ड्राईव्ह मिळाले असल्याची माहिती एटीएसने कोर्टात दिली आहे. शस्रास्रांसोबत ज्या कारचा वापर करण्यात आला त्याची पडताळणी करायची असल्याचं एटीएसनं कोर्टात सांगितलं. तर वासुदेव सूर्यवंशीच्या घरातून १ डीव्हीडी, २ मोबाईल फोन, सिम कार्ड्स, ५ पॉकेट डायरीज मिळाल्या आहेत.

आरोपींचे वकील संजीव पुनाळेकर यांनी या दोघांनीही तीन दिवसांपूर्वीच अटक झाल्याची बातमी टीव्हीवर पाहिली असल्याचं कोर्टात म्हटलं. ते दिवसही ते कोठडीत असल्याचं गृहीत धरण्याची मागणी पुनाळेकर यांनी केली. आमच्यासमोर जी रिमांड कापी आणि पंचनामा आहे तोच आम्ही गृहीत धरणार असं कोर्टाने स्पष्ट केलं. आणि दोघांचीही रवानगी १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत केली. मोदी, शहा आणि अडवानी... सांगा काय सांगतेय या नेत्यांची देहबोली?

Trending Now