नालासोपारा स्फोटक प्रकरणी जळगावमधून एटीएसने घेतलं एकाला ताब्यात

News18 Lokmat
जळगाव, 12 सप्टेंबर : नालासोपारा स्फोटक प्रकरणी जळगावमधून एटीएसने आणखी एकाला ताब्यात घेतलंय. साकळी तालुक्यातील यावल इथं राहणाऱ्या एका तरूणाला ताब्यात घेतल्याने खळबळ उडालीये.नालासोपारा स्फोटक प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आज साकळी येथील राहाणाऱ्या एका तरूणाला जळगाव येथून ताब्यात घेतलंय. तरूणाचे नाव किरण निंबादास मराठे (28) असं आहे. या आधी 6 सप्टेंबरला वासुदेव भगवान सूर्यवंशी आणि 7 सप्टेंबरला विजय उर्फ भैय्या उखर्डु लोधी या दोघांना अटक केली होती. दोघांना 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दोघांच्या चौकशीअंती एटीएसने ही कारवाई केल्याचे समजते.आज सायंकाळी जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोरून एटीएसच्या एका पथकाने किरण निंबादास मराठे यास ताब्यात घेतलंय. किरण मराठे हा साकळी दंगलप्रकरणी संशयित आरोपी आहे. स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाकडून करण्यात आलेल्या चॅप्टर केसचा जामीन मिळवण्यासाठी किरण जळगाव इथं गेला होता. किरण एका मित्रासोबत कार्यालयाबाहेर चहा पिण्याकरीता निघाला असता एटीएसच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलंय. किरणला सोबत घेऊन पथक नाशिककडे निघाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एटीएसने साकळीत एका आठवड्यात तिसर्‍यांदा कारवाई केल्यानं एकच खळबळ उडालीये.====================================================VIDEO : आतापर्यंत कधी न पाहिलेले धावत्या रेल्वेखाली तरुणाचा भयंकर स्टंट

Trending Now