खळबळजनक खुलासा : 'मुंबई, पुणे, सातारा हिंदु्त्ववाद्यांच्या रडारवर', 20 बॉम्ब जप्त

मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारामध्ये मोठा घातपात घडवण्याचा आरोपींचा कट होता, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिलीय.

मुंबई, ता.10 ऑगस्ट : नालासोपारामधल्या स्फोटकं जप्त प्रकरणी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारामध्ये मोठा घातपात घडवण्याचा आरोपींचा कट होता, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिलीय. एटीएसनं अटक केलेला हिंदुत्ववादी सनातनी कार्यकर्ता वैभव राऊतला त्याच्या दोन साथीदारांसह न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी तपासयंत्रणेच्या हाती लागलेली माहिती सरकारी वकिलांना कोर्टाला सादर केली. आरोपी वैभव राऊतकडून 20 बॉम्ब आणि 2 जिलेटीन कांड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. वैभवच्या चौकशीदरम्यान ज्या दोघांची नावं समोर आली त्या शरद कळस्कर आणि सुधन्वा गोंधळेकर या दोघांनाही अटक केलीय. आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई एटीएसनं नालासोपाऱ्यातल्या भांडार अळीमधल्या वैभव राऊतच्या घरी छापा मारून स्फोटकं जप्त केली. आणि घातपाताचा मोठा कट उधळलाय. दरम्यान आरोपीच्या वकिलांनी सरकारनं लावलेले आरोप फेटाळवले आहेत.कट्टर 'सनातन' कायम संशयाच्या भोवऱ्यात का असते?नालासोपारा स्फोटकं प्रकरणात आणखी एकजण ताब्यात

नालासोपाऱ्यात एटीएसने सर्वात मोठी कारवाई करत पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पश्चिमेकडील भंडारआळी परिसरात एका बंगल्यात एटीएसच्या पथकाने छापा मारला. यात संशयित आरोपी वैभव राऊतला एटीएसने ताब्यात घेतलंय. वैभव राऊतच्या घरात 20 देशी बॉम्ब सापडले आहेत. तर बॉम्ब बनवण्याची मोठी सामग्री पोलिसांनी जप्त केली आहे.

हिंदुत्ववादी वैभव राऊत यांची अटक म्हणजे 'मालेगाव पार्ट २' !

सनातन साधकाच्या घरी सापडला बॉम्ब साठा, एटीएसची मोठी धाड

डॉग स्कॉड, फॉरेन्सिक टीमकडून अद्याप या बंगल्यात तपास सुरू आहे. नालासोपारा भांडार आळीत राहणाऱ्या सनातन संस्थेचे कार्यकर्ते वैभव राऊत यांच्या घरी गुरवारी रात्री एटीएसने धाड टाकून मोठ्या प्रमाणात स्पोटके जप्त केली होती.वैभव राऊतच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका दुकानात बॉम्ब बनवण्याची सामुग्री मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली. या साहित्यात गन पावडर आणि डिटोनेटर असून त्यांच्यापासून दोन डझन हून अधिक बॉम्ब बनविण्यात येऊ शकतील.गणेशोत्सवावरून मनसे आणि शिवसेना आमने - सामनेशहीद मेजर कौस्तुभ राणेंसाठी बहिणींनी आणल्या होत्या राख्या, केक आणि चॉकलेट पण...वैभव राऊत याने ही विस्पोटके का आणि कशी जमा केली याचा आता एटीएस कसून तपास करत आहे. एटीएसची टीम गेल्या काही दिवसापासून सतत पाळत ठेऊन होती. आणि शेवटी गुरूवारी रात्री त्याच्या घरी धाड टाकून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Trending Now