फॅन पडून दोन महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

घरातील बेडवर निद्रीस्त असतांना अचानक सिलिंग फॅन तिच्या अंगावर पडला अन् गंभीर जखमी झालेली नेत्रा नंतर कायमचीच निद्रीस्त झाली

Sachin Salve
नागपूर, 09 मे : बेडरूममधील चालू सिलिंग फॅन पडून दोन महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डायमंड नगर मध्ये घडली.नेत्रा वाडेकर चिमुकली घरी झोपली असतांना अचानक चालू सिलिंग फॅन तिच्या डोक्यावर कोसळल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी नेत्राची आई एकटीच असून स्वयंपाकघरात काम करत होती. नेत्राला जन्म घेऊन अवघे दोनच महिने झाले होते.घरातील बेडवर निद्रीस्त असतांना अचानक सिलिंग फॅन तिच्या अंगावर पडला अन् गंभीर जखमी झालेली नेत्रा नंतर कायमचीच निद्रीस्त झाली. आम्ही सिलिंग फॅन च्या मेंटन्स कडे लक्ष न दिल्याने हा अपघात झाला चे नेत्राच्या वडिलांना वाटते.

Trending Now