आगळा वेगळा मुहूर्त साधत नागपुरात पार पडलं जुळ्यांचं संमेलन

'जुडवा' सिनेमातली सलमान खानची जुळ्या भावंडांची भुमिका तुम्हाला आठवतेय? अशाच जुळ्या भावंडांचं एक आगळ वेगळ संमेलन रविवारी नागपुरात पार पडलं.

प्रवीण मुधोळकर, नागपूर, 9 सप्टेंबर : 'जुडवा' सिनेमातली सलमान खानची जुळ्या भावंडांची भुमिका तुम्हाला आठवतेय? अशाच जुळ्या भावंडांचं एक आगळ वेगळ संमेलन रविवारी नागपुरात पार पडलं. नव्या महिन्याच्या नऊ तारखेच औचित्य साधत जुळ्या भावंडांचं 'जुडवा नंबर 1' संमेलन नागपुरात आयोजित करण्यात आलं होतं.गेल्या 15 र्षांपासून हे संमेलनात आयोजित करण्यात येत आहे. रविवारी पार पडलेल्या या आगळ्या वेगळ्या संमेलनात लहानग्यांपासून ते अगदी 80 वर्षांच्या वृद्ध जुळ्या आजी आणि आजोबांनीही सहभाग घेतला होता. देशभरातील ‘सेम-टू-सेम’ बंधू-भगिनींनी हजेरी लावली होती.आजची तारीख 9 आणि महिनाही नववा असल्याचं औचित्य साधत नागपुरात जुळ्या बहिण भावंडाचे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. जुडवा नंबर वन या नावाने हे अनोखं संमेलन भरवण्यात आलं. नागपूर, हैदराबाद आणि मध्यप्रदेशातील शेकडो जुळे स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. अगदी लहानग्या बाळापासुन ते अगदी 80 वर्षे वयोगटातील जुळ्या आजी आणि आजोबा या स्पर्धेत सहभागी झाले होते. वेगवेगळ्या वेशभूषेत आलेल्या जुळ्या बहिण भावांनी यावेळी ‘रॅम्प वाक’ही केला.

Trending Now