ठाण्यातले खड्डे बुजवण्यासाठी पालिका आयुक्त रस्त्यावर, रात्रभर उभं राहून बुजवून घेतले खड्डे

नवीन अमेरीकन पद्धतीने काही तासात रस्ते खड्डे मुक्त होतात याची पाहणीदेखील केली

ठाणे, २९ ऑगस्ट- ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळं चहुबाजूनं पालकमंत्री आणि आयुक्त संजीव जैस्वाल यांना टीकाकारांना तोंड द्यावं लागतंय. त्याचबरोबर गणपती आगमनापूर्वीचं ठाण्यातील रस्ते खड्डे मुक्त होतील असं आश्वासन आयुक्त आणि पालकमंत्र्यांनी जनतेला दिलंय. त्यामुळं आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आयुक्त संजीव जैस्वाल चक्क मध्यरात्री ३ वाजेपर्यंत खड्डे बुजवत होते. गेले काही दिवस ठाणे मनपा आयुक्त हे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत खुपच गंभीर असल्याचं पाहायला मिळतंय. थेट आयुक्तच रस्त्यावर उतरलेले पाहतांना ठाणेकरांनीही आयुक्तांच्या या कामाचं स्वागत केलंय.ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यामुळे चहुबाजूने होत असलेली टिका आणि मतदान बहिष्कारासारखी मोहीम, यामुळे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जैस्वाल तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वत्र तोंड द्यावं लागत होतं. गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी ठाण्यातील रस्ते खड्डे मुक्त होतील असं आयुक्त आणि पालकमंत्री यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी मध्यरात्री ३ वाजेपर्यंत आयुक्त संजीव जैस्वाल आपल्या अधिकाऱ्यांच्या टीमसह रात्रभर ठाण्यातल्या रस्त्यांवरील खड्डे बुझवत होते.पावसानं घेतलेली विश्रांती पाहता दोघांनी नवीन अमेरीकन पद्धतीने काही तासात रस्ते खड्डे मुक्त होतात याची पाहणीदेखील केली. गेली काही दिवस ठाणे मनपा आयुक्त हे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत खुपच गंभीर असल्याचे दिसत असताना विविध एक्सपर्ट बरोबर बैठका घेऊन पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांना घेऊन थेट आयुक्त रस्त्यावर उतरले पाहतांना ठाणेकरांनीही आयुक्तांच्या या कामाचे स्वागत केले. मल्हार टाॅकीजपासून खड्डे बुझवण्याचे काम सुरु झाले ते थेट, खारटन रोड, कोरस रोड आणि दोस्ती असे मुख्य रस्ते रात्रभरात आयुक्त संजीव जैस्वाल यांनी उभं राहून खड्डे मुक्त केले.

VIDEO : न चूकता विठ्ठलाला नतमस्तक होणारा 'तेजा'काळाच्या पडद्याआड !

Trending Now