मुंबई, ठाण्यात दहीहंडीची धूम, 6 गोविंदा जखमी

मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. विविध गोविंदा पथकं थर लावून हंडी फोडण्याचा प्रयत्न करताहेत. अशा प्रयत्नांमध्ये आत्तापर्यंत 6 गोविंदा जखमी झालेत.

मुंबई, ता. 3 सप्टेंबर : मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. विविध गोविंदा पथकं थर लावून हंडी फोडण्याचा प्रयत्न करताहेत. अशा प्रयत्नांमध्ये आत्तापर्यंत 6 गोविंदा जखमी झालेत. या सर्व गोविंदांवर हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू असून सगळ्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. केईएम हॉस्पिटलमध्ये 3, जेजे हॉस्पिटलमध्ये 1, मुलूंडच्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये 1 आणि व्ही.एन. देसाई हॉस्पिटलमध्ये 1 गोविंदा उपचारासाठी दाखल आहे. मुंबई आणि ठाण्यात दुपारनंतर दहीहंडीचा उत्साह वाढत जातो. त्यामुळे संध्याकाळीही वातावरणात जल्लोष असतो. पोलीस आणि प्रशासनाने सर्व गोविंदा पथकांना काळजीपूर्वक खेळण्याचं आवाहन केलंय. थोडी काळजी घेतली तर आनंदावर विरजण पडणार नाही आणि उत्तमपणे खेळही खेळता येईल.गोविंदा पथकं, आयोजक आणि प्रत्यक्ष खेळणाऱ्या गोविंदांनी काळजी घेतली तर या खेळाचं आनंद वाढू शकतो असं पोलिसांनी म्हटलं आहे. मुंबई, ठाण्यातल्या या उत्सवाला सध्या कॉर्पोरेटचं रूप आलं असून राजाश्रय मिळत असल्यानं त्याची उलाढाल काहीशे कोटींवर गेली आहे.व्हिडिओ : अशी फोडली गोपिकांनी हंडी

ठाण्यात प्रो-गोविंदा स्पर्धेत 10 थरांसाठी मनसे देणार...!अनेक मंडळं बॉलीवूडच्या कलाकारांना या उत्सवासाठी आमंत्रित करीत असल्यानं दहीहंडी उत्सवाला ग्लॅमरही मिळालं आहे. मात्र उंच थर लावून दहीहंडी फोडण्याचा कल वाढत असल्यानं त्या विरूद्ध काही जण कोर्टात गेले आणि बक्षीसाचं अमिष दाखवून उंच थर लावण्याच्या प्रयत्नांना सुप्रीम कोर्टानं जोरदार चाप लावलाय. उंच थरांवर बंधणं आलीत. या उत्सवाला साहसी क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्याची मगणीही दरवर्षी होत असते.व्हिडिओ : अशी फोडली गोपिकांनी हंडी

Trending Now