मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातामुळे वाहतूक कोंडी

एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि क्रेनच्या धडकेत झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत

Samruddha Bhambure
07 मे :  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कामशेत बोगद्याजवळ अपघात झाला आहे. ट्रक आणि क्रेनच्या धडकेत दोघेजण जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांची प्रचंड कोंडी झाली होती, पण आता वाहतुक हळूहळू सुरळीत होत आहे.कामशेत बोगदा ते ताजे पेट्रोलपंपदरम्यान सकाळी सव्वाआठच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटल्याने तो समोरून जाणाऱ्या क्रेनवर मागून जोरात आदळला. या अपघातात दोन जण जखमी आहेत. हा ट्रक अंडी घेऊन निघाला होता, परिणामी रस्त्यावर फुटलेल्या अंड्यांचा खच पडला आहे.अंडी घेऊन जाणाऱ्या ट्रकमधल्या अंड्यांचा रस्त्यावर खच पडून रस्ता बुळबुळीत झाला होता. त्यामुळे गाड्या थांबवून रस्ता धुण्याचं काम सुरू होतं. परिणामी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीचा या अपघातामुळे पुरता बोजवारा उडालेला. ऐन रविवारी झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल होत होते.

Trending Now