गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास टोल फ्री,

पण मुंबई-गोवा महामार्ग खड्डे फ्री कधी होणार, प्रवाशांचा संतप्त सवाल

मुंबई, ०७ सप्टेंबर- कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना यावर्षी गणपती बाप्पा पावला आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या भक्तांना ११ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर दरम्यान टोलमाफी मिळणार, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.मात्र गणेशभक्तांना हा टोल फ्री प्रवास खड्ड्यांची चाळण असलेल्या रस्त्यावरुनच करावा लागणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरचे खड्डे भरण्यासाठी दिलेल्या अनेक डेडलाइन आत्तापर्यंत पाळण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे चंद्रकांतदादांच्या राज्यात चंद्रावरचाच प्रवास नशिबी आहे का? असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.गणेशभक्तांना कोल्हापूर मार्गेही टोल फ्री प्रवास करता येणार आहे. तसेच गणेशभक्तांचा परतीचा प्रवासही टोल फ्री होणार असल्याचे बांधकाममंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.

VIDEO : समलिंगी संबंधांबाबतच्या निर्णयावर हे सेलिब्रिटी काय म्हणताहेत?

Trending Now