महाराष्ट्रात आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा

मुंबईकरांनो आज कामानिमित्त घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घ्यायला विसरू नका.

Renuka Dhaybar
14:05 (IST)

डबलडेकर बसला वांद्र्यात अपघात, कलिनाच्या दिशेने जात असलेल्या बसला अपघात, बस ओव्हहेड रेलिंगला धडकली

14:03 (IST)

दक्षिण मुंबईत अनेक शाळांना सुट्टी. काही शाळा तासभराने सोडल्या. पावसाचा इशारा आणि पूल दुर्घटनेमुळे शिक्षकांची उपस्थिती कमी

14:03 (IST)

सखल भागात साचलेलं पाणी ओसरायला सुरुवात

14:01 (IST)

महाराष्ट्रात आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा

11:08 (IST)

तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही हे हेल्पलाईन नंबर वापरू शकता
अंधेरी - 022676 30054
चर्चगेट - 02267622540 02222082809
बोरिवली - 02267634053 02228051580
मुंबई सेंट्रल - 02267644257
सुरत - 02602401791

10:25 (IST)

प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टतर्फे रेल्वेस्थानकांवरून जास्तीच्या बसेस सोडण्यात येणार

10:24 (IST)

आज डबेवाल्यांची सेवा बंद

10:22 (IST)

वेस्टर्न एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

09:59 (IST)

पोलिस आयुक्तांना रस्त्यावरील वाहतुक सुरळीत ठेवण्याचं तसंच बेस्टच्या अतिरिक्त सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्यात

09:38 (IST)

09:31 (IST)

पश्चिम द्रुतगती मार्ग आणि एसवी रोडवर ट्राफिक असल्यानं ठाण्याला उतरून घोडबंदर रोडवरून बोरिवलीकडे जाता येईल, कारण तिथून डाऊनला विरारकडे जाऊ शकता

09:27 (IST)

09:16 (IST)

मध्य रेल्वेवर घाटकोपरच्या पुढील स्थानकांवर कोणतीही गडबड होऊ नये याकरता महत्त्वाच्या सर्व रेल्वे स्थानकांवर गर्दी नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याची एनडीआरएफची माहिती

09:08 (IST)

काल रात्री पासूनच्या मुसळधार पावसामुळे अंधेरी पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे अंधेरी-विरार वाहतूक ठप्प झाली आहे. लोकलच्या रुळावर पुलाचा काही भाग कोसळला आहे.

09:01 (IST)

अंधेरीत पादचारी पुलाचा काही भाग रेल्वे रुळावर कोसळला !

मुंबई, 03 जुलै : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. ऑफिसला जाण्याच्या वेळेत पश्चिम रेल्वे खोळंबल्याने अनेक चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.सुदैवाने त्यावेळी खालून लोकल ट्रेन जात नसल्याने मोठा अनर्थ टळला. रेल्वे बंद पडल्याने प्रवाशांनी रस्ते मार्गाने ऑफीस गाठण्याचा प्रयत्न केला. यात पावसाची भर पडल्याने रस्त्यांवरील वाहतूकही मंदावली आहे. 

 

Trending Now