मिलिंद एकबोटे कारागृहाबाहेर येण्याची शक्यता

जामीन अर्जाचा युक्तिवाद आज संपल्यानंतर न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांना 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केलाय.

Sachin Salve
पुणे, 19 एप्रिल : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी कारागृहात असलेल्या मिलिंद एकबोटेंना पोलीस कर्मचाऱ्याने दाखल केल्या गुन्ह्यात एकबोटेला जामीन मंजूर झालाय. त्यामुळे एकबोटेंचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाय.शिक्रापूर पोलीस ठाण्यात मिलिंद एकबोटे यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये पहिला गुन्हा हा अॅट्रोसिटी आणि दंगल भडकवल्याप्रकरणी होता तर दुसरा गुन्हा हा बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना झालेल्या दुखपतीबद्दल होता. यापैकी अॅट्रोसिटी आणि दंगल भडकवण्याच्या गुन्ह्यात एकबोटे यांना 4 एप्रिल रोजी जामीन मंजूर झाला होता.मात्र, त्या दिवशी शिक्रापूर पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यात एकबोटे यांना अटक केली. शिक्रापूर न्यायालयाने त्यांना या प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यानंतर केलेल्या जामीन अर्जाचा युक्तिवाद आज संपल्यानंतर न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांना 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केलाय.

Trending Now