आजपासून मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे-वर 'मेगाब्लॉक' ; असं असेल वेळापत्रक

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आजपासून काही ठिकाणी दरडी हटवण्याचं काम करण्यात येणार आहे. आज भातण आणि अमृतांजन बोगद्याबाहेर दर १५ मिनिटांनी वाहतूक बंद करण्यात येईल.

Sachin Salve
06 फेब्रुवारी : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आजपासून काही ठिकाणी दरडी हटवण्याचं काम करण्यात येणार आहे. आज भातण आणि अमृतांजन बोगद्याबाहेर दर १५ मिनिटांनी वाहतूक बंद करण्यात येईल. आडोशी बोगदा आणि खंडाळा बोगद्याजवळचं काम थोडं नंतर सुरू होणार आहे. १४ मार्चपर्यंत हे काम चालणार आहे.पावसाळ्यात दरडी कोसळू नयेत यासाठी हे काम करण्यात येत आहे. दुरुस्तीचं काम सुरू असताना बोगद्याच्या आधी कोंडी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे गाडीचा वेग कमी ठेवा, असं आवाहन सगळ्यांकडून करण्यात येतय.मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे-वर 'मेगाब्लॉक'

- भातण बोगदा - 6 आणि 7 फेब्रुवारी - स. 10.00 ते 10.15- आडोशी बोगदा - 8, 9, 14, 15 आणि 16 फेब्रुवारी - स. 10.45 ते 11.00 आणि  11.30 ते 11.45- खंडाळा बोगदा - 20, 21, 22, 23, 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च - दु. 12.15 ते 12.30 आणि  1.30 ते 1.45- अमृतांजन बोगदा - 6, 7, 8, 9, 13, 14 फेब्रुवारी - दु. 2.15 ते 2.30 आणि  3.00 ते 3.15

Trending Now