मी राम की रावण हे नांदेडची जनताच ठरवेल- अशोक चव्हाण

'मी राम आहे की रावण हे नांदेडची जनताच ठरवेल', असं जोरदार प्रत्युत्तर अशोक चव्हाणांनी संभाजी पाटील निलंगेकरांना दिलंय. कालच्या भाजप मेळाव्यात कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी अशोक चव्हाणांवर 'नांदेडचा रावण' अशी शेलक्या भाषेत टीका केली होती.

Chandrakant Funde
नांदेड, 14 सप्टेंबर : 'मी राम आहे की रावण हे नांदेडची जनताच ठरवेल', असं जोरदार प्रत्युत्तर अशोक चव्हाणांनी संभाजी पाटील निलंगेकरांना दिलंय. कालच्या भाजप मेळाव्यात कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी अशोक चव्हाणांवर 'नांदेडचा रावण' अशी शेलक्या भाषेत टीका केली होती. त्याला आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलंय. 'निलंगेकर काय बोलतात याचा समाचार घेतला जाईल',असंही अशोक चव्हाणांनी म्हटलंय.नांदेडमध्ये सध्या महापालिकेच्या निवडणुका लागल्यात. अशोक चव्हाणांच्या ताब्यात असलेली ही मनपा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसलीय. त्यासाठी भाजपने काल लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात मेळावा घेतला. तसंच शिवसेनेचे आमदार प्रताप चिखलीकर यांनाही आपल्या गोटात खेचलंय. त्यामुळे नांदेडच्या मनपा निवडणुकीत अशोक चव्हाण विरूद्ध सर्वपक्षीय विरोधक असा जोरदार राजकीय सामना बघायला मिळणार आहे.

Trending Now