मराठा आरक्षणासाठी निलेश राणे यांनी मुंबई गोवा हायवे रोखला

आज मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या रत्नागिरी बंद दरम्यान माजी खासदार निलेश राणे आणि मराठा आंदोलकानी रत्नागिरीत रास्ता रोको केला आहे.

रत्नागिरी, 03 ऑगस्ट : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अवघा महाराष्ट्र पेटून उठला आहे. हा पेटलेला वणला काही केल्या विजताना दिसत नाही आहे. कारण आज मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या रत्नागिरी बंद दरम्यान माजी खासदार निलेश राणे आणि मराठा आंदोलकानी रत्नागिरीत रास्ता रोको केला आहे. तर निलेश राणे यांनी मुंबई गोवा हायवे रोखला मराठा आरक्षणासाठी रत्नागिरीत सकल मराठा समाजासोबत युवानेते निलेश राणे रस्त्यावर उतरले आहेत. मुख्यमंत्र्यांमुळेच आज राज्यात मराठा समाजावर अशा प्रकारची आंदोलनं करण्याची वेळ आली आहे असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. तर कराडच्या कृष्णा नदी पात्रात उतरून मराठा समाजाच्या आंदोलकांनी आंदोलनदेखील केलं आहे.LIVE : सांगलीच्या निकालात टि्वस्ट, काँग्रेस-राष्ट्रवादीला मागे टाकत भाजपची आघाडीमराठा समाजच्या आंदोलनावेळी झालेल्या दगडफेकचे गुन्हे मागे घ्यावेत आणि मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा या नदीच्या पाण्यात बुडवण्यात आला. पोलीस या आंदोलनाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आंदोलकांना पाण्यातून बाहेर येण्यासाठी सांगितलं पण आंदोलकांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नदी पत्रातून बाहेर येणार नसल्याचे सांगितलं.  तब्बल दीड तासानंतर हे आंदोलक या नदीपत्रातून बाहेर आले. पोलीस आंदोलकांना पांगवण्याचं आणि रोखण्याचं काम करत आहे.

Jalgaon Corporation election 2018 : जळगावात 'कमळ' उमललं, सुरेशदादांना धक्कादरम्यान, मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी जीवाची बाजी लावली. कालही मराठा आरक्षणासाठी तरुणीने विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवळाली गावात घडली. तृष्णा तानाजी माने (वय १९) असे या तरुणीचे नाव आहे. ती बी-कॉमच्या द्वितीय वर्षाला होती. यापुर्वी झालेल्या मराठा मूक मोर्चामध्ये ती सहभागी झाली होती.मराठा आरक्षणासाठी पेटवलेल्या या आंदोलनामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. यात आंदोलनाला हिंसक वळण देत पोलिसांसह अनेक नागरिक जखमी झालं. त्यामुळे आता सरकार यावर काय निर्णय घेणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.हेही वाचा...Jalgaon Election 2018: गुरू सुरेशदादांवर भारी पडला शिष्यJalgaon Election 2018: जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडासाफVIDEO : मुंबईमध्ये विद्यार्थ्यांची चेंगराचेंगरी, मोठा अपघात टळला  

Trending Now