मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे खरे की स्टंटबाजी ? हे आहे सत्य
मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी राज्यातल्या आमदारांनी राजीनामा नाट्य सुरू केल्याची टीका होतेय.
मुंबई, 27 जुलै : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी राज्यातल्या आमदारांनी राजीनामा नाट्य सुरू केल्याची टीका होतेय. कारण आतापर्यंत 6 आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. मात्र प्रत्यक्षात औरंगाबादच्या कन्नड मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवलाय. तर इतर पाच आमदारांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पोहोचलाच नसल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे मराठा आरक्षणाचं अशा पद्धतीने राजकारण होतय का अशी टीकाही आता सगळ्यांकडून करण्यात येत आहे.आरक्षणाच्या हालचालींना वेग, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची रात्री उशीरा बैठकमराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर आणि रमेश कदम भाजपच्या सीमा हिरे आणि राहुल आहेर, तसंच काँग्रेसचे भारत भालके यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवलीय. त्यानुसार राजीनामा देण्यासाठी आमदारांनी स्वतः विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवणं अपेक्षित असतं. मात्र हर्षवर्धन जाधव सोडून आणखी कोणत्याही आमदारांनी ते धाडस दाखवलेलं नाही. त्यामुळे आरक्षणासाठी राजीनामा देणं हे निव्वळ नाटक आहे असंच म्हणावं लागेल.