आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा तरुणांचं उपोषण, 14 जणांची प्रकृती गंभीर

मुंबईत आझाद मैदानात मराठा समाजातील तब्बल 57 कार्यकर्ते गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषनाला बसले आहेत. यापैकी तब्बल 14 उपोषणकर्त्यांची तब्बेत गेल्या 2 दिवसांपासून अतिशय ढासळली आहे.

Samruddha Bhambure
04 जून : मराठा आरक्षण आणि अन्य विविध मागण्यांसाठी मुंबईत आझाद मैदानात मराठा समाजातील तब्बल 57 कार्यकर्ते गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषनाला बसले आहेत. यापैकी तब्बल 14 उपोषणकर्त्यांची तब्बेत गेल्या 2 दिवसांपासून अतिशय ढासळली आहे.गेल्या 6 दिवसांपासून उपोषणकर्त्याची सरकारपातळी वरून कोणतीच दखल जात नसल्याने आजपासून उपोषणकर्त्यांनी तब्बेत खालावली तरी यापुढे उपचार घेणार नाही असा निर्धार व्यक्त केलाय. सरकार एखादा उपोषणकर्ता मरण्याची वाट पाहतेय का..? असा सवालही उपोषकर्त्यांनी केला आहे. तर औरंगाबादच्या 67 वर्षीय आप्पासाहेब आहेर आणि प्रा संभाजी पाटील यांनी 2 दिवसांत सरकारने उपोषणाची दखल घेतली नाही तर मंत्रालयसमोर विष प्राशन करू असा गंभीर इशारा दिला आहे.दरम्यान, आम्हीही शेतकऱ्यांची मुलं असल्याने कर्जमाफीच्या मुद्य्यावर ठाम असून उद्याच्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभरातील कार्यकर्ते सहभागी होतील अशी माहितीही उपोषणकर्त्यांनी दिली. मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी जोपर्यंत विधासभेच विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा होत नाही तोपर्यंत जीव गेला तरी चालेल पण आझाद मैदानातून उठणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केलाय.

Trending Now