माओवाद्यांकडून दोन आदिवासींची गळा चिरून हत्या

छत्तीसगडच्या सीमेवर सशस्त्र माओवाद्यांनी आज पहाटे छत्तीसगडमधल्या दोन नगरिकांची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केली.

गडचिरोली, ता. 2 सप्टेंबर : छत्तीसगडच्या सीमेवर सशस्त्र माओवाद्यांनी आज पहाटे छत्तीसगडमधल्या दोन आदिवासी नगरिकांची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केली. ही घटना एटापल्ली तालुक्यातील गट्टा (जांभिया) उपपोलिस ठाण्यापासून १ किलोमीटर अंतरावरील ताडगुडा मार्गावर घडली. सोनू पदा (३५)व सोमजी पदा (४०)दोघेही रा.उलिया,(बांदे, छत्तीसगड)अशी मृतांची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ते २५ सशस्त्र माओवादी काल सोनू पदा व सोमजी पदा यांच्या गावी गेले. त्यांना झोपेतून उठवून बाहेर नेले व नंतर त्यांची शस्त्राने गळा कापून हत्या केली.माओवाद्यांनी दोघांचेही मृतदेह गट्टा उपपोलिस ठाण्यापासून उत्तरेस १ किलोमीटर अंतरावर असलेल्या ताडगुडा मार्गावर फेकून ठेवले. आज सकाळी दोघेही मृतावस्थेत आढळून आले. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन त्यांची हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे.कन्हैया कुमारची देशाच्या राजकारणात एण्ट्री, बिहारमधून लढणार निवडणूक

पुण्यात दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून दुचाकी जाळलीआदिवासींचे मसिहा म्हणविणाऱ्या माओवाद्यांनी सातत्याने विरोध करणाऱ्या आदिवासींची हत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. गडचिरोली आणि परिसरातल्या छत्तीगड सीमेवरच्या भागात अशा अनेक घटना घडल्या असून अनेक आदिवासींना आपला जीव गमवावा लागला आहे.माओवाद्यांना मदत केली नाही तर त्यांच्याकडून आणि पोलिसांना मदत केली नाही तर पोलिसांकडून या भागातल्या आदिवासींना छळाला सामोरे जावे लागते. अशा कात्रित इथले अदिवासी सापडले आहेत. सातत्याने माओवाद्यांचं समर्थन करत मानवाधिकाराच्या गप्पा करणारे मानवाधिकार कार्यकर्ते अशा हत्यांच्यावेळी आवाज का उठवत नाही असा प्रश्न आता विचारण्यात येतोय.

VIDEO : धावत्या लोकलच्या दारात तरुणीची स्टंटबाजी

 

Trending Now