मराठवाडा- विदर्भात बळीराजा सुखावला, तब्बल १ महिन्यांनी पावसाचे पुनरागमन

हिंगोली जिल्ह्यात मागील २४ तासात ३७ मीमी पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत जिल्ह्यात ४९४ मीमी पाऊस पडला

पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र काही भागांत ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू झाला. कालपासून काही भागांत पावसानं हजेरी लावली आहे. येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. बीडमध्ये तब्बल दिड महिन्याने पावसाचे पुनरागमन झाले असल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. बीडप्रमाणेच उस्मानाबादमध्येही पावसाने काल रात्रीपासून हजेरी लावली आहे. राज्याच्या अमरावती, हिंगोली या भागातही कालपासून पावसाची संतत धास सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.हिंगोली जिल्ह्यात मागील २४  तासात ३७ मीमी पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत जिल्ह्यात  ४९४ मीमी पाऊस पडला आहे. ऑगस्ट मध्य पर्यंत जिल्ह्यात सरसरीच्या ५५ % पावसाची नोंद झाली आहे.  इथे मोठ्या प्रमाणात खरीप पिकांची शेती होते. तसेच सातारा येथील महाबळेश्वर, पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे. सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला असून, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. प्रती सेकंद २७ हजार ७६० क्युसेक पाण्याचा कोयना नदीत विसर्ग केला जात आहे.हेही वाचा-

अटल बिहारी वाजपेयी व्हेंटिलेटवर, 'एम्स' मध्ये सुरू आहेत उपचार, पंतप्रधान भेटीलाया आहेत भारतातल्या 10 सगळ्यात श्रीमंत महिला !

Trending Now