Marathwada Rain: नांदेड- हिंगोली जिल्ह्यातील अतिवृ्ष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला

२ दिवसांपासून सहा गावचे नागरिक आणि प्राणी एकीकडे अडकले आहे

News18 Lokmat
नांदेड, १८ ऑगस्ट- हिंगोली जिल्ह्यात १५ दिवसांच्या खंडानंतर पावसाने दमदार पुनरागमन केलेय. मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळालं असलं तरी, मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. पारोळा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे पारोळा ओढा ओसंडून वाहत आहे . पुलावरून पाणी वाहत असल्याने पारोळा, भांडेगाव, साटंबा, जामठी, सावा, नवलगव्हाण या सहा गावांचा संपर्क तुटलाय.२ दिवसांपासून सहा गावचे नागरिक आणि प्राणी एकीकडे अडकले आहे. ओढ्यावरच्या पुलाची उंची वाढवण्याची मागणी नागरिक अनेक वर्षांपासून करत आहेत. विशेष म्हणजे एका व्यक्तीला अतिशहाणपणा नडला. रस्ता बंद असतानादेखील ओसंडून वाहणाऱ्या पाण्यातून पूल पार करण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा वेग जास्त असल्याने तो वाहून गेला. मात्र जवळच्या नागरिकांनी त्या व्यक्तीला ओढ्याबाहेर काढले. अतिशहाणपणामुळे या व्यक्तीचा जीव जाता  जाता वाचला. मागील २४ तासांत जिल्ह्यात ६५ मीमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत ६३% सरासरी इतका पाऊस झाला आहे.नांदेडमधील आठ तालुक्यात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे नांदेडमधील विष्णुपुरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, किनवट येथील पूरस्थिती निवळली असून,जनजीवनदेखील पूर्ववत झाले आले. दोन दिवसांच्या पावसामुळे नांदेडमधील विष्णुपुरी धरण १०० टक्के भरले आहे. पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. या दोन दरवाज्यांमधून प्रती सेकंद ७९८ क्युमेकने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सुरु आहे.

पाऊस वाढला किंवा पाण्याची पातळी वाढली तर धरणाचे आणखी काही दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा  इशारा दिला आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ५७६ मीमी पावसाची नोंद झाली आहे. नांदेडसह अर्धापुर, भोकर, हदगाव, मुदखेड, हिमायतनगर, किनवट, माहुर या आठ तालुक्यात अतिव्रुष्टी झाली. माहुरमध्ये सर्वाधिक १८८ मीमी तर किनवटमध्ये २४ तासांत १३३ मीमी पावसाची नोंद झाली आहे.हेही वाचा-Vidharbha Rain: विदर्भात पावसाचे थैमान, हेमलकसाशी संपर्क तुटलानंदुरबारमध्ये पुराचे थैमान, 5 जणांचा मृत्यूPHOTOS : साताऱ्यात पाणीच पाणी, ढोल्या गणपती मंदिरात शिरलं पाणी

Trending Now