पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात लपलेला बिबट्या तब्बल 10 तासांनंतर जेरबंद

हिंगणा परिसरातील डिगडोह परिसरात राहणारे ए. जी. बायस्कर या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात सकाळी बिबट्या शिरला.

Renuka Dhaybar
16 एप्रिल : नागपूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात लपून बसलेल्या बिबट्याला तब्बल 10 तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद करण्यात यश आलं. हिंगणा परिसरातील डिगडोह परिसरात राहणारे ए. जी. बायस्कर या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात सकाळी बिबट्या शिरला.घरात शिरताच बिबट्यानं थेट बाथरूम गाठलं. बायस्कर यांनी प्रसंगावधान दाखवत बाथरूमचा दरवाजा बंद केला. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी वनविभागाला पाचारण करण्यात आलं.बिबट्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाथरूमच्या खिडकीशिवाय दुसरा कोणाताच मार्ग नव्हता. त्यामुळं बिबट्याला बेशुद्ध कसं करायचं असा प्रश्न वनअधिकाऱ्यांसमोर उभा होता. ही धावपळ 10 तास सुरू होती. अखेर बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Trending Now