तीन तरुण मुलींसह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या

छाया चव्हाण असं या मृत महिलेचं नाव आहे. तर शीतल, पल्लवी आणि अश्विनी चव्हाण अशी आत्महत्या केलेल्या तीन मुलींची नावं आहेत.

Sonali Deshpande
उस्मानाबाद, 20 सप्टेंबर : तीन तरुण मुलींसह आईनं विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सलगरा गावात घडलीये. छाया चव्हाण असं या मृत महिलेचं नाव आहे. तर शीतल, पल्लवी आणि अश्विनी चव्हाण अशी आत्महत्या केलेल्या तीन मुलींची नावं आहेत.तुळजापूर तालुक्यातल्या सलगरा गावात चव्हाण कुटुंब राहतं. आत्महत्या केलेली शीतल ही बीएच्या शेवटच्या वर्षाला होती. तर पल्लवी बारावीला  आणि अश्विनी ही अकरावीला होती. चौघा मायलेकींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येमागचं कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. चौघा मायलेकींच्या सामूहिक आत्महत्येनं परिसरावर शोककळा पसरलीये.

Trending Now