मराठा क्रांती मोर्चाची उद्या महत्त्वाची बैठक

या बैठकीला राज्यभरातील समन्वयक येणार असल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.

01 आॅगस्ट : मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचे राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. सरकारने वाटाघाटी करण्यास सुरुवात केलीये. या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवारी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांशी महत्वाची तातडीची बैठक होणार आहे. बीडच्या परळी इथं सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यभरातील समन्वयक येणार असल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आजही काही ठिकाणी जाळपोळ आणि चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी चक्का जाम आंदोलन केलं तर नांदेडमधील अर्धापूर तालुक्यात मेंढला गावाजवळ आंदोलकांनी महामार्गावर रास्तारोको करत एक ऑटो रिक्षा पेटवली. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.तर मालेगावमधील शिवाजी चौकात आंदोलकांनी जेलभरो आंदोलन केलं. लातूरमध्येही आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. सध्या संभाजी पाटील निलंगेकरांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला.

तर दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची मुंबईत मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजासाठी अनेक घोषणा जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा संघटना सरकारी योजना अंमलबजावणी यासाठी जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली समिती केली जाणार आहे. यात मराठा संघटना पदाधिकारी समवेत प्रशासकीय अधिकारी असतील. यापुढे मराठा युवकांना बँकांकडून दहा लाख कर्ज घेताना राज्य सरकार बॅक गॅरिंटी देईल असा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुंबईत झाली. उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सदस्य विनोद तावडे, एकनाथ शिंदे, सदानंद मोरे आणि संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित होते.राज्य सरकारच्या मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीत घेतलेले निर्णय  - मराठा समाजाासाठी योजनांची अंमलबजावणीसाठी आता २० जणांची जिल्हा निहाय समिती जिल्हाधिकारी अध्यक्ष खाली समिती असेल, त्यात दहा अधिकारी तर उर्वरित दहा यात मराठा संघटना प्रतिनिधी असेल. ही समिती विद्यार्थी फी, वस्तिगृह, कर्ज याचा आढावा घेत राहील. - बँका दहा लाख कर्ज देताना गँरिटी देताना अडचण येते असे समोर आले, त्यामुळं बँकांनी आता कर्ज देताना कोलॅटरेल किंवा माॅडगेज मागायचे नाही, सरकार कर्जाची गॅरिन्टी राहील, मराठा समजातील मुलांना कर्ज घेताना अडचण येणार नाही. - प्रत्येक जिल्हयात सरकार वापरात नाही ती इमारत ताब्यात घेत हाॅस्टेल सुरू केले जातील. वस्तीगृह मिळालेच नाही त्यांना दहा हजार रूपये मदत विद्यार्थीना मिळेल. - पीएचडी करू पाहणारे विद्यार्थीना देशात अथवा परदेशात फेलोशिप मिळेल.- स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात केंद्र सुरू केले जाईल.हेही वाचाजळगाव, सांगलीत 55 टक्के मतदान, दोन 'दादां'चं वर्चस्व पणाला  VIDEO : 'आम्ही जर नसलो तर कसं होणार?,आम्हाला आमचा धंदा करू द्या'

दलित संघटनांचा विजय,'अॅट्रॉसिटी'बद्दल केंद्राचा मोठा निर्णय

 

Trending Now