पोलिसांना पाहुन पळाले अन् पितळ उघडे पडले !

कुरुंदा भागातील टोकाईगड जवळ पोलीस गस्त घालताना काही लोक पोलिसांना पाहून मंदिराच्या जवळ असलेले लोक पळून गेले

हिंगोली, 25 आॅगस्ट: हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात गुप्तधनसाठीचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. गस्तीवर असलेल्या पोलिसांना पाहुन क्रुरकृत्य करणारे तरुण पळाले पोलिसांनी जेव्हा पाठलाग केला तेव्हा घडलेला प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केलीये.कुरुंदा भागातील टोकाईगड जवळ पोलीस गस्त घालताना काही लोक पोलिसांना पाहून मंदिराच्या जवळ असलेले लोक पळून गेले. पोलिसांना संशय आल्यावर त्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता खड्यात एक माणूस बसलेला होता आणि खड्डा खोदलेला आढळला,पोलिसांनी अधिक चौकशी केली असता खड्डा गुप्त धन काढण्यासाठी करत असल्याची माहिती माहिती मिळाली.

गुप्तधनाच्या लालसेने खोदकाम करणाऱ्या चौघांवर कुरुंदा पोलीस ठाण्यात जादूटोणा कायद्यान्वये शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकास अटक केली असून त्या ठिकाणावरून हळद-कुंकू तांदुळाच्या पुड्या आणि एक लिंबू जप्त केले आहे.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्याठिकाणी एक खड्डा खोदण्यात आला असून जादूटोणा करून गुप्तधनाच्या उद्देशानेच हा खड्डा खोदल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी वसमत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्रसिंग धुन्ने पुढील तपास करीत आहेत. तसंच कुरुंदा पोलिसांचे एक पथक उर्वरित तिघांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, काल शुक्रवारी औरंगाबादमध्ये गुप्तधनासाठी एका चिमुरडीचा बळी देण्याची घटना घडणार होती मात्र वेळीच अंनिस आणि पोलिसांनी धाव घेऊन हा डाव उधळून लावला. ही घटना आहे औरंगाबाद जवळील फुलंब्रीच्या रांजणगाव इथं घडली. गुप्त धन काढून देण्यासाठी आज रांजणगाव परिसरात एका कुमारिकेची नग्न पूजा करण्यात येणार होती मात्र अंनिसच्या कार्यकर्ता यांनी आणि फुलंब्री पोलिसांनी वेळीच छापा मारून 2 मांत्रिकांसोबत पूजेचे साहित्य जप्त केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका बालिकेचा जीव वाचला.मांत्रिक बाळू शिंदे असं या भामट्याचे नाव आहे आणि त्याच्यासोबत इमाम पठाण हा त्याचा सहकारी आहे. या घरातून गुप्तधन काढण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले. फुलंब्री तालुक्यातील या दोन भामट्या मांत्रिकांनी दिगंबर जाधव याला जुन्या घरातील गुप्त धन काढण्यासाठी दोन लाख रुपये उकळले. आज सकाळी दिगंबर जाधव यांच्या घरात भामट्या मांत्रिकाने विश्वास बसवा यासाठी चलाखीने गाडलेली देवीची मूर्ती उकरून काढली ज्यामुळे जाधव कुटुंबाचा विश्वास या भामट्या बाळू शिंदे यांच्यावर बसला.आज दिगंबर जाधव यांच्या घरात जुन्या घरात धनाचा हंडा काढण्यासाठी विशेष पूजेचे आयोजन आज केले. मात्र अंनिसचे कार्यकर्ते शहाजी भोसले यांना या प्रकरणाची कुणकुण लागली आली. भोसले यांनी फुलंब्री पोलीसच्या मदतीने हा प्रकार उधळून लावला.

Trending Now