पुण्यात सनबर्न कॉन्सर्टमध्ये बॉम्बस्फोट घडवायचा हिंदुत्ववाद्यांचा होता कट

शरद कळसकरकडून मिळालेल्या काॅम्प्युटरमधून माहिती डीकोड करण्यात आली आहे.

मुंबई, 28 आॅगस्ट : पुण्यातील सनबर्न वेस्टर्न म्युझिक कॉन्सर्टमध्ये बॉम्बस्फोट घडवायचा हिंदुत्ववाद्यांचा कट होता अशी धक्कादायक माहिती समोर आलीये.तसंच बेळगावमध्ये पद्मावत सिनेमाच्या शो दरम्यान सिनेमागृहात स्फोट घडवायचा होता अशी माहिती समोर आली. नालासोपारा स्फोटक जप्ती प्रकरणी अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या कॉम्प्युटरमधून ही माहिती डीकोड करण्यात आल्याचं आज एटीएसनं कोर्टासमोर सांगितलं. आज वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या तिघांना मुंबई सत्र न्यायालयानं हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टानं तिघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.नालासोपारा स्फोटक प्रकरणी वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांची आज पोलीस कोठडी संपणार होती. या तिघांना मुंबई सत्र न्यायालयानं दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्याचा आज शेवटचा दिवस होता तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलंय. यावेळी एटीएसच्या वकिलांनी कोर्टात धक्कादायक माहिती सांगितली. आॅक्टोबर 2016 आणि 2017 मध्ये देहू आणि आळंदीच्या मध्ये असलेल्या मोशीमध्ये हे फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले होते. या फेस्टिव्हलला सनातन आणि हिंदूत्वावादी संघटनासह गावकऱ्यांनी विरोध केला होता. एवढंच नाहीतर कोर्टातही धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने सनातनची याचिका फेटाळून लावली होती.

अमोल काळेच मास्टरमाईंडदरम्यान, कर्नाटक एसआयटीच्या चौकशीत आरोपी अमोल काळेनं अनेक मोठे खुलासे केले आहेत. कॉम्रेड पानसरे, एमएम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा मास्टरमाईंड अमोल काळेच होता या तिन्ही हत्या एकाच पिस्तुलानं केल्याचंही काळेनं सांगितलंय. या पिस्तुलाला या हल्लेखोरांनी सुदर्शन चक्र असं नाव दिलं होतं. का तर सुदर्शन चक्र हे श्रीकृष्णाचं शस्त्र होतं म्हणून, ही बाबही चौकशीतून उघड झाली आहे. दुसरी गोष्ट अशी की तिघांच्या हत्येचा कट रचण्यामध्ये अमित डेगवेकर आणि राजेश बंगेरांचाही हात होता, आणि अमोल काळे या कटाचा मास्टरमाईंड होता. काळे हा मास्टर प्लॅनर होता, डेगवेकरनं पैशांची व्यवस्था केली आणि बंगेरानं शस्त्र प्रशिक्षण आणि वाहनाची व्यवस्था केली, असं तपासात उघड झालं आहे. बैलगाडी शर्यतीत आला पहिला, अतिउत्साहात गाडीतून गेला तोल, आणि...! VIDEO

Trending Now