मराठा आरक्षण : फेसबुकवर मुख्यमंत्र्यांच्या नावाने पोस्ट टाकून त्याने स्वतःला जाळून घेतले

परभणीच्या एका युवकाने मराठा आरक्षणासाठी फेसबुकवर मुख्यमंत्र्यांच्या नावाने पोस्ट टाकून स्वतःला जाळून घेतले.

News18 Lokmat
परभणी, 5 ऑगस्ट : परभणीच्या एका युवकाने मराठा आरक्षणासाठी फेसबुकवर मुख्यमंत्र्यांच्या नावाने पोस्ट टाकून स्वतःला जाळून घेतले. रविवारी सेलु तालुक्यातील डीग्रस वाडी गावात ही घटना घडली. अंनत लेवडे असे या युवकाचे नाव आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे ही इच्छा असल्यानं मी स्वतः बलीदान देत असल्याचे त्याने मुख्यमंत्र्यांना टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.मराठा आरक्षणाचा मुद्दा सद्या पेटलेला आहे. राजकीय आणि सामाजीक अशा सर्वच स्तरावर माराठा आरक्षणाच्या मुद्यावरून बैठका पार पडताहेत. हा मुद्दा पेटलेला असतांना रविवारी परभणी जिल्ह्यातील सेलु तालुक्यातल्या डीग्रस वाडीत राहणाऱ्या अंनत लेवडे या तरुणाने शेतात जाऊन स्वतःला पेटऊन घेतले. हे करण्यापूर्वी त्याने फेसबुकवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने एक पोस्ट टाकली. त्यात, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मी आज स्वतःचे बलीदान देत आहे. मला आज खूप आनंद होत आहे की, मी आपल्या जातीसाठी काहीतरी करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. आजवर माला देशासाठी काही करता आले नाही, पण मी मागासलेल्या माराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्वतःचे बलीदान देत असल्याचे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अहमदनगर रोडवरील कायगाव इथं मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 23 जुलै रोजी दुपारी जलसमाधी आंदोलन केलं होतं. कायगाव टोका येथील गोदावरी पात्रावरील पुलावर त्यांनी हे आंदोलन केलं. पण हे आंदोलन सुरू असताना काकासाहेब शिंदे नावाच्या तरूणाने नदीतच उडी घेतली आणि नदीत बुडून त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात आत्महत्यांचे सत्र सुरू झाले.औरंगाबादच्या मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर प्रमोद होरे पाटील (28) या युवकाने मराठा आरक्षणासाठी रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली. प्रमोदनेसुद्धा आत्महत्या करण्याआधी फेसबुकवर 'मराठा आरक्षण जीव जाणार' अशा कॅप्शन सह त्याचा रेल्वे ट्रॅकवरील फोटो पोस्ट केला होता. प्रमोदची ही पोस्ट वाचल्यानंतर त्याच्या मित्रमंडळींनी त्याला शोधण्यासाठी सुरूवात केली आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी प्रमोदचा मृतदेह मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाबाहेर सापडला.उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवळाली गावात राहणाऱ्या तृष्णा तानाजी माने (वय १९) या तरुणीने मराठा आरक्षणासाठी विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. राज्यात मराठा आरक्षणासाठी वेळोवेळी झालेल्या आंदोलनांत ती सहभागी झाली होती.हेही वाचा..VIDEO: मराठा आंदोलकांनी खासदार हिना गावित यांची गाडी फोडलीही मीच आहे आणि मी फार खूश आहे, Friendship Day वर सोनाली बेंद्रेचा अनोखा संदेशVIDEO: भरसभेत राज्यमंत्रीने महिलेचा पदर डोक्यावरून सरकवला 

Trending Now