पुण्यात भर रस्त्यात मुलीची छेडछाड;व्हिडिओ व्हायरल

चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत भर रस्त्यात मुलीची छेडछाड करण्यात आली. मुलांचा घोळका या मुलीची छेड काढताना दिसतोय. नंतर तू कुणाला बोलावणार असा प्रश्नही विचारतोय.

Chittatosh Khandekar
13 नोव्हेंबर: पुण्यात भररस्त्यात मुलीची  छेडछाड काढल्याची घटना घडली आहे. एवढंच नाही तर या छेडछाडीचा व्हिडिओ व्हायरलही झालाय.चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत भर रस्त्यात मुलीची छेडछाड करण्यात आली. मुलांचा घोळका या मुलीची छेड  काढताना दिसतोय.  नंतर तू कुणाला बोलावणार असा प्रश्नही विचारतोय.   अहमदनगर रोडवरील उप्पाला हॉटेल शेजारी ही घटना घडली आहे. या प्रकाराने पुण्यात खळबळ माजली आहे.   याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. या प्रकरात मुलगी तक्रार द्यायला समोर न आल्यामुळे पोलिसांना गुन्हा दाखल करायला अडचणी येत आहेत.पुण्याच्या महापौर आणि पोलीस आयुक्तही महिला असूनही पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

Trending Now