गौरी लंकेश हत्या प्रकरणात नवं ट्विस्ट, समोर आलं जळगाव कनेक्शन

कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचे जळगाव कनेक्शन समोर येत आहे.

जळगाव, 14 ऑगस्ट : कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचे जळगाव कनेक्शन समोर येत आहे. कारण कर्नाटक पोलीस गुप्तचर यंत्रणा जळगाव शहरात दाखल झाली आहे. त्यांच्या सोबत कोल्हापूर पोलिसांची दोन पथकंही आहेत. या पथकाने शहरातील कोल्हे हिल्स या उच्चभ्रू भागात घरांची तपासणी केली असल्याची माहिती हाती लागत आहे.या सगळ्या तपासाबाबत आणि जळगाव कनेक्शनबाबत पोलिसांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत पोलीस अत्यंत गुप्तता पाळत आहेत. याची कोणतीही माहिती लिक होऊ नये यासाठी स्थानिक पोलिसांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत.कोल्हापूर अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बावकर हे देखील या पथकात सामिल आहेत. त्यांच्याकडूनही मोठी गोपनीयता बाळगण्यात आली आहे. त्यामुळे आता या तपासातून काय माहिती समोर येतेय याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

या प्रकरणाच्या तपासात पोलीसांनी धक्कादायक खुलासाही केला होती की, अटकेतील एका आरोपीकडे एक डायरी मिळाली होती. त्यात काही मान्यवरांची नावं होती. त्यात गिरीष कर्नाड क्रमांक एकवर होते तर गौरी लंकेश यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर होतं. ही यादी देवनागरीत लिहिली असून त्यात साहित्यिक बी.टी. ललिता नाईक, निदुम्मिदी मठाचे पुजारी वीरभद्र चन्नामलाल स्वामी आणि पुरोगमी कार्यकर्ते व्दारकनाथ यांच्या नावांचा समावेश होता.VIDEO : गुजरातमध्ये महाराष्ट्रीयन दोन महिलांची तुफान मारामारी

Trending Now