#EcoFriendly : अशी साकारते गायीच्या शेणापासून गणेशमूर्ती!

मुंबईसह अनेक राज्यांमध्ये गाईंच्या शेणापासून आणि साध्या मातीपासून पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनविल्या जातात.

प्रदीप वाडेकर, प्रतिनिधी पुणे, 28 ऑगस्ट : अगदी काही दिवसांवर सर्वांचा आवडता सण गणोशोत्सव येऊन ठेपला आहे. मुंबईसह अनेक राज्यांमध्ये गाईंच्या शेणापासून आणि साध्या मातीपासून पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनविल्या जातात. मावळ तालुक्यातील तळेगाव येथे या पर्यावरण पूरक गणेशमूर्ती महिला बनवीत असून या गणेश मूर्तीना देशातच नव्हे तर परदेशातही भरपूर मागणी आहे.प्रसाद सिंदगी या केमिकल इंजिनियरने प्लास्टर ऑफ परीस किवा रासायनिक रंग वापरून बनविलेल्या गणेशमूर्ती बनवण्याच काम हाती घेतलं आहे. पर्यावरणाला प्रदूषणाचा धोका होत असल्याचं ओळखून आपली शक्कल लढवीत त्यांने गाईच्या शेणापासून आणि साध्या मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याचा उपक्रम चालू केला आणि बघता बघता या मुर्त्यांची मागणी वाढू लागली.

जाणून घेऊयात नेमके काय फायदे आहेत ते...नायट्रोजन – पाण्यात नायट्रोजन सायकलस वाढवतेफोस्फरस – जीवाणू नष्ट करण्यास मदत करतेपोटेशियम – जल शुधीकारनास कारक आहेतुरटी – पाणी स्वच्छ करते आणि गाळ बसवतेशेण – शेणाचे फायबर मासे आणि जलचरासाठी उत्तम खाद्यया पर्यावरण पूरक मूर्तीचे अनोखे वैशिष्ठे म्हणजे यातून 'एक गणपती एक झाड' ही संकल्पना राबविली जातेय, कारण या गणपतीबरोबर एक मोदक दिला जातो या मोदकात कडुलिंब, जांभूळ, चिक्कू अशा झाडांच्या बिया आहेत, ज्यामुळे या बिया जमिनीत रुजून याचे भविष्यात झाडात रूपांतर होईल.मंडळी या मूर्तींचे फायदे अजून संपले नाहीत. यात आणखी खास म्हणजे मूर्तिकार प्रसाद सिंदगी यांच्या मार्गदर्शनाखाली ३० महिला हा कारखाना चालवतात. संपूर्ण देशात महिलांनी चालवलेला गणेश मूर्ती बनविण्याचा हा एकमेव कारखाना आहे. मूर्ती बनविण्यापासून ते रंगकाम  आणि विक्रीपर्यंतचा सगळा कारभार या महिलाच पाहतात. त्यामुळे बचत गटाच्या या गरजू महिलांच्या हाताला काम मिळाले आहे.या वर्षी २४०० गणेशमूर्ती बनविण्याचे उद्दिष्ठ प्रसाद सिदंगी यांनी ठेवले आहे. सर्व शहरातून तसेच अमेरिका, इंग्लंड या ठिकानाहून या मूर्तींची मागणी वाढत आहे. एकंदरीत या पर्यावरण पूरक गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर पर्यावरणाला फायदाच होणार आहे. प्रत्येकाने या पर्यावरण पूरक गणेशमूर्तींची स्थापना केली तर पर्यावरणाचा ऱ्हास नक्कीच थांबेल आणि बाप्पाला ही नक्कीच आनंद होईल. 'Post Office'ची नवी सुविधा, 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळणार बक्कळ पैसे

Trending Now