....आणि अशापद्धतीने डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या मारेकऱ्याचा तपास लागला

गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांची हत्या एकाच रिव्हॉलवरने केली आहे का?

दाभोलकांच्या मारेकऱ्यांचा तपास कधीच लागणार नाही का? असा सवाल उभ्या महाराष्ट्राला सतावत होता. न्यायलयानंदेखील याच मुद्द्यावरून तपासयंत्रणांना वारंवार फटकारलं होतं. मात्र अचानक तपासाची अशी कोणती चक्र फिरली की ज्यामुळं तपासयंत्रणा मारेकऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचले.. पाहुयात हा स्पेशल रिपोर्टअखेर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा छडा लागला. त्यांची हत्या शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांनी कशी केली हे ही तपासात समोर आलंय मात्र या सर्वांमागे मुख्य सुत्रधार कोण? कोण या सर्वांना कटपुतली सारखं नाचवत होतं? कोण आहे तो पडद्यामागचा सुत्रधार? याचा तपास आता सर्वच तपास यंत्रणांन समोर एक मोठं आव्हान आहे. अंधश्रध्दा आणि धार्मिक कट्टरतेपासून समाजाला परावृत्त करण्यासाठी झटणाऱ्या डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली.या प्रकरणाच्या धिम्या तपासासाठी टीकेचे धनी ठरलेल्या तपास यंत्रणांना अखेर पाच वर्षांनंतर दाभोलकरांच्या मारेकऱ्यांच्या छडा लावण्यात यश आलंय. नालासोपारा स्फोटकं प्रकरणातील आरोपी शरद कळस्करनं दिलेल्या जबाबावरून सीबीआयनं सचिन अंदुरेला औरंगाबादमधून अटक केली. याच सचिन अंदुरेनं दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा आरोप सीबीआयनं केलाय. सचिन अंदुरेच्या अटकेसाठी टर्निंग पॉईन्ट ठरला तो म्हणजे एटीएसने नालासोपाऱ्यात स्फोटकांसह अटक केलेल्या वैभव राऊतचा जबाब.

गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांची हत्या एकाच रिव्हॉलवरने केली आहे का? की एकाच साच्यातून बनवलेल्या ४ वेगवेगळ्या रिव्हॉलवरने चौघांच्या हत्या करण्यात आल्या आहेत? या दृष्टीकोनातून आता सीबीआयने तपास सुरु केलाय. वैभव राऊतच्या नालासोपारा येथील घर आणि दुकानातून मिळालेले १० पिस्तूल बॅरल, ६ अर्धवट तयार केलेल्या पिस्तूल, ३ अर्धवट मॅग्झीन, ७ अर्धवट पिस्तुल स्लाईड, १६ रिले तसंच सुधन्वा गोंधळेकर याच्या पुण्यातील घरातून मिळालेली स्फोटकं आणि बंदूक बनवण्याची माहिती देणारं पुस्तकं हे सर्व साहित्य फॉरेन्सीक प्रयोग शाळेत पाठवण्यात आली आहेत. आता, अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या म्होरक्याचा शोध घेण्याचं आव्हान एटीएस आणि तपासयंत्रणेसमोर असणार आहे.

Trending Now