VIDEO: अहो, ड्रायव्हर साहेब ही 'टारझन कार' नाही, बस आहे!

राज्य परिवहन विभागाच्या दर्यापूर आगारातील चालक एका हाताने बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

संजय शेंडे, प्रतिनिधीअमरावती, 12 सप्टेंबर : राज्य परिवहन विभागाच्या दर्यापूर आगारातील चालक एका हाताने बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दर्यापूर आगाराची बस क्रमांक एम एच २०-बी एफ १९३१ ही शनिवार ८ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता दर्यापूर निंभारीमार्गे अंजनगाव सुर्जीसाठी निघाली होती. बसमध्ये २० ते २५ प्रवासी होते.बस दर्यापूर शहर पार करत अकोट दर्यापूर टी-पॉइंटवरून अंजनगाव सुर्जी मार्गावर लागताच बसचालकाने बस वेगाने चालवण्यास सुरुवात केली. रस्त्यात काही आडवे आले तर जोरात ब्रेक दाबणे, मोकळा रस्ता दिसला की भरधाव बस पळवणे, गतिरोधक आला तर वाहन हळू न चालवणे, खड्ड्यात बस आपटणे, त्यामुळे प्रवासी एकमेकांच्या अंगावर तसंच पुढील सिटवर धडकत होते. त्यानंतर लेहेगाव फाटा पार करताच चालक एक पाय समोरील बफरवर ठेवून एकाच पायाने क्लच, ब्रेक, एक्सिलेटर हाताळत होता.

Trending Now