दाभोलकर हत्येप्रकरणी जळगावमधून एक जण ताब्यात

दाभोलकरांच्या हत्येत वापरण्यात आलेलं वाहन साकळी येथील असल्याचा संशय तपासात व्यक्त झालाय.

जळगाव, 07 सप्टेंबर : डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्येचे कनेक्शन आता जळगावापर्यंत पोहोचले आहेत. एटीएसच्या पथकाने एक खळबळजनक कारवाई केली आहे. दाभोलकर हत्येप्रकरणी जळगावमधून एकाला ताब्यात घेण्यात आलंय. यावल तालुक्यातील साकळी गावातून विशाल उर्फ सुखदेव भगवान सूर्यवंशीला ताब्यात घेतलंय. दाभोलकरांच्या हत्येत वापरण्यात आलेलं वाहन साकळी येथील असल्याचा संशय तपासात व्यक्त झालाय. पथकानं विशाल याच्या घराची सुमारे अडीच तास झडाझडती घेतली. बंद घरातून पथकास काय आक्षेपार्ह आढळले याची माहिती देण्यास या पथकानं नकार दिलाय. अत्यंत जलद आणि गोपनीय हालचाली या पथकानं केल्यानं चर्चेला उत आलाय. दरम्यान, संशयित विशालला अधिक तपासासाठी मुंबईत नेल्याची सूत्रांची माहिती आहे.

कोण आहे सुखदेव सूर्यवंशी ?- विशाल उर्फ सुखदेव भगवान सूर्यवंशी- जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की गावातील मूळ रहिवासी- साकळीत गेल्या 8 ते 10 वर्षांपासून आई आणि आजीसोबत मामाकडे राहायला- साकळीत दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज VIDEO: दाभोलकरांवर गोळ्या झाडल्यानंतर अंदुरे, कळसकर कसे गेले पळून ?

Trending Now