सावळी आहे म्हणून पत्नीला पेटवले, आत्महत्येचा केला बनाव !

गणेश गायकवाडअंबरनाथ, ता. 24 जुलै : दिसायला सावळी आहे आणि लग्नात हुंडा दिला नाही म्हणून एका विवाहितेला जिवंत पेटलवल्याचा संतापजनक प्रकार अंबरनाथ तालुक्यात घडला आहे. पेटवून देणारे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ही आत्महत्या असल्याचा बनाव देखील केला.वैशाली ही काकडवाल गावातील दुधकर कुटूंबियांची लेक. बीएससी झालेल्या वैशालीचे दोन वर्षांपूर्वी अंबरनाथ तालुक्यातील वसार गावात संगम वायले याच्या बरोबर तिचा विवाह झाला. मात्र विवाह प्रसंगी मानपान न केल्याने आणि दागिने न दिल्याने तिचा पती संगम आणि सासू लिलाबाई अतोनात छळ करीत होती. तू दिसायला सावळी आहे मला शोभत नाही. तुझ्या घरच्यांनी आम्हाला ठरल्या प्रमाणे हुंडा दिला नाही असा वैशालीचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. अखेर २० जुलै च्या मध्य रात्री वैशालीला तिच्या पती आणि सासूने जिवंत पेटवली. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सतत हसणाऱ्या आणि दुसऱ्यांना हसवणाऱ्या आपल्या पोटच्या मुलीला सासरच्यांनी जिवंत पेटवून दिल्याने दुधकर कुटुंब दुःखात बुडाले आहेत.

मराठा आंदोलकांनी नवी मुंबईत जाळल्या पोलिसांच्या गाड्या, पहा हा LIVE व्हिडिओवैशाली ही उच्च शिक्षित होती तिच्या खुप आकांशा होत्या. मात्र सासरचे लोक चांगली वागणूक देत नसल्याने ती हताश झाली होती. तिला जिवंत जाळल्यावर तिच्या सासारच्यांनी वैशालीने स्वतः पेटवून घेतल्याचे वैशालीच्या घरच्यांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर त्यांना थोडा संशय आला होता. त्यांनी वैशालीचा मृतदेह मुंबईला पाठवला तिथे तिच्या अंगावर जखमा असल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले. त्यानंतर मध्यवर्ती पोलिसात पती संगम आणि सासू लीलावतीच्या विरोधात हत्येचा आणि हुंडा बळीचा गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.वैशालीला दीड वर्षाचा मुलगा आहे. मात्र तो आता आईच्या मायेला पोरका झालाय. मात्र पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही हुंड्यासाठी महिलेचा बळी जातोय हे पुरोगामी असल्याचा टेम्भा मिरवणाऱ्या महाराष्ट्रासाठी नक्कीच शरमेची बाबा आहे.हेही वाचा..Mumbai Band LIVE : अखेर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर बंद मागेVIDEO : साताऱ्यात मराठा मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्जVIDEO : वाशिममध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन 

Trending Now