बाभडबारी घाटात कंटेनरची एसटीला धडक, 6 प्रवासी जागीच ठार

नंदूरबार-नाशिक एसटीचा देवळा-चांदवड मार्गावरील बाभडबारी घाटात मोठा अपघात झाला आहे.

मनमाड, 04 सप्टेंबर : नंदूरबार-नाशिक एसटीचा देवळा-चांदवड मार्गावरील बाभडबारी घाटात मोठा अपघात झाला आहे. एसटी बस आणि कंटेनरची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 6 प्रवासी जागीच ठार झाले आहेत तर 12 ते 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.प्रवाशांनी भरलेली नंदूरबार-नाशिक एसटीही देवळा-चांदवड मार्गावरून येत होती. यावेळी समोरून येणाऱ्या कंटेवरची बसला जोरात धडक बसली. यात दोन्हीही गाड्यांचा चुरा झाला आहे. तर बसमधील 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान, घटना घडताच स्थानिकांनी आणि इतर प्रवाशांनी जखमींना तात्काळ चांदवड-देवळा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावरून 6 मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

या क्रिकेटरने सानिया मिर्झाची काढली छेड, होऊ शकते आजीवन बंदी

Trending Now