काँग्रेसची नावे मतदार याद्यांमधून गायब करण्यासाठी आरएसएसची फौज कामाला- अशोक चव्हाण

सरकारचा मंत्रालयात एवढा भ्रष्टाचार सुरू आहे की खाऊन खाऊन जुलाब लागले आहेत

सांगली, ०२ सप्टेंबर- भाजप विरोधातील काँग्रेसची नावे मतदार याद्यांमधून गायब करण्यासाठी आर.एस.एस. ची फौज कामाला लागली आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर मतदान घ्या, असं आव्हानही त्यांनी सरकारला दिलंय. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान ते सांगलीत बोलत होते.मोदी-शहा जोडी काँग्रेसला घाबरली आहे, देशात मोदी हुकुमशाही करत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. भीमा कोरेगाव प्रकरणाचा छडा लावला जातोय पण दाभोलकर, पानसरेंचे खुनी पकडले जात नाहीयेत. कारण पुरोगामी विचार सरकारला संपवायचा आहे, असा आरोपही त्यांनी केलाय.आम्ही हरलो असलो तरी काय झाले पण येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार तसेच या सरकारचा मंत्रालयात एवढा भ्रष्टाचार सुरू आहे की खाऊन खाऊन जुलाब लागले आहेत, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

2019 ची निवडणूक लांब नाही, मोदी-शहा जोडी काँग्रेसला घाबरली आहे, तसेच देशाला मोदींती कशी हुकूमशाही सुरू आहे, हे समजले आहे. त्यामुळे देशातील बाकी सगळे पक्ष एकत्र आलेत. तसेच ज्यादा दरामध्ये राफेल खरेदी करणार पण रॉकेल स्वस्त देणार नाही. भीमा कोरेगाव प्रकरणाचा छडा हे लवकर लावत आहेत. पण दाभोलकर, पानसरे, यांच्या गुन्ह्यातील आरोपी लवकर पकडत नाहीत. महाराष्ट्रामधील पुरोगामी विचार या सरकारला संपवायचा आहे, असे वक्तव्य राधा कृष्ण विखे पाटील यांनी केले.महाराष्ट्रातला औद्योगिक दर घसरत चालला आहे. मोदींचा नोटांबंदीसारखा निर्णय मूर्खपणाचा आहे. आपल्या मित्राचा काळा पैसा सफेद करण्यासाठी मोदींनी ही नोट बंदी केली आहे. २१०९ ची निवडणूक लांब नाही, मोदी- शहा जोडी काँग्रेसला घाबरली आहे. देशामध्ये मोदी काय आहे हे लोकांना आता कळले आहे. जर मोदी परत सत्तेत आले तर या देशात संविधान, लोकशाही, निवडणूक होणार नाहीत. असे वक्तव्य माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.मराठा समाज आरक्षण, धनगर समाज आरक्षण, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच आमच्या सरकारच्या सत्ताकाळामध्ये ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर आमच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करा असे सांगणारे आताचे मुख्यमंत्री आणि मुनगंटीवारवर १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर किती गुन्हे दाखल करायचे असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केला.

VIDEO : धावत्या लोकलच्या दारात तरुणीची स्टंटबाजी

Trending Now