'नमो' अॅप डिलीट करायचा सल्ला देणाऱ्या काँग्रेसचंच अॅप झालं डिलीट!

आता हे काँग्रेसने डिलीट केलं की काही तांत्रिक बिघाडांमुळे डिलीट झालं हे काही अजून स्पष्ट झालेलं नाही.

Chittatosh Khandekar
26 मार्च: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नमो अॅप डिलीट करण्याचा  सल्ला काल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला होता. पण ज्य दिवशी हा सल्ला दिला त्यच दिवशी काँग्रेसचं स्वत:चेच अॅप  डिलीट झालंय.काल नमो अॅप अमेरिकेला सगळी माहिती पाठवत असल्याची टीका राहुल गांधींनी केली होती.त्यानंतर भाजपकडून राहुल गांधींनाही प्रत्युत्तर दिलं गेलं. काँग्रेसंचं  अॅप सगळी माहिती सिंगापूरला पाठवत असल्याचा दावा स्मृती इराणींनी  पुराव्यासकट केला.

त्यानंतर त्याचा आशयाचं ट्विट  अमित मालवीय यांनी देखील केलंं. अमित मालवीय हे भाजपचे सोशल मीडिया सेलचे हेड आहेत. मी राहुल गांधी असून काँग्रेसचं अॅप सगळी माहिती सिंगापूरला पाठवत असल्याचं ट्विट त्यांनी केलं. यानंतर काही तासाच्या आत काँग्रेसचं अॅप प्लेस्टोअरवर दिसेनासं झालं .

आता हे काँग्रेसने डिलीट केलं की काही तांत्रिक बिघाडांमुळे डिलीट झालं हे काही अजून स्पष्ट झालेलं नाही.पण दुसरीकडे नमो अॅप मात्र अजूनही सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसचं अॅप  खरंच डिलीट का झालं हा प्रश्न काही सुटत नाही. 

Trending Now