भद्रावतीत आता वनविभागाचं ड्रोन घेणार वाघाचा शोध!

भद्रावती शहरात पुन्हा एकदा वाघाचा दिसल्यामुळे आता वनविभागाने ड्रोनचा वापर करून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

चंद्रपूर, 10 सप्टेंबर : चंद्रपूरच्या भद्रावती शहरात पुन्हा एकदा वाघाचा वावर झाल्याने नागरीकामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. भद्रावतीच्या आयुध निर्माणी भागात एकीकडे घनदाट जंगल आणि बाजूला मानवी वस्ती असल्यामुळे आता ड्रोनचा वापर करून वाघाचा ठावठिकाणा शोधण्याचे प्रयत्न वनविभागाने सुरु केले आहेत.भद्रावती शहरात पुन्हा एकदा वाघाचा वावर अनुभवायला मिळत आहे. केंद्रीय दारुगोळा कारखाना अर्थात आयुध निर्माणी भागात नागरिकांना हा वाघ दिसला आहे. दोन दिवसांपूर्वी बसस्थानकाच्या मागे रानडुकराची शिकार करून त्यावर ताव मारणारा वाघ नागरिकांनी पाहिला होता.वनविभाग आणि प्रशासन सतर्क झाल्यामुळे दिवसभर अभियान राबविल्यावर महतप्रयासाने वाघाला जंगलात पिटाळून लावण्यात आले होतेच. आता घनदाट जंगल आणि बाजूला मानवी वस्ती यामुळे दहशत वाघाची पुन्हा एकदा दहशत झाल्याने ड्रोनचा वापर करून वाघाचा ठावठिकाणा शोधण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती भद्रावतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसकर यांनी दिलीय. यात कितपत यश येते याकडे भद्रावातीवासीयांचे लक्ष लागले आहे.

 VIDEO : पेट्रोल दरवाढीविरूद्धच्या आंदोलनात आव्हाडांनी का चालवली बैलगाडी?

Trending Now