तकलादू नाही तर टिकणारे आरक्षण आम्ही देणार- चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षणाचा इतिहास लिहिताना मुख्यमंत्री आणि माझ्यावर चार- चार पानं लिहावी लागतील

सांगली, २८ ऑगस्ट- मराठा आरक्षणाचा इतिहास लिहिताना मुख्यमंत्री आणि माझ्यावर चार- चार पानं लिहावी लागतील. तसेच माझ्या खिशातील तीन कार्ड काढल्यास विरोधकांसाठी २०१९ ची निवडणूक संपेल, असे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. मराठा आरक्षणाचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल त्यावेळेस मुख्यमंत्री आणि माझ्यावर चार चार पाने लिहावे लागतील, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. सांगलीत मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता तयार करण्यात आलेल्या वसतिगृहाच्या उद्घाटन कार्यकमप्रसंगी चंद्रकात पाटील बोलत होते.मराठा आरक्षणासाठी या अगोदर 'सकस' प्रयत्न झाले नाहीत, त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न लटकत राहिला. खानदेशातील मराठा लोकांनी ज्यावेळेस आपण कुणबी असल्याचे लावून घेतले त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रतील मराठा नेत्यांनी आपण कुणबी मराठा लावण्यास नकार दिला. नाहीतर १९६८ मध्येच हा प्रश्न सुटला असता, असेही पाटील म्हणाले. आमचे सरकार तकलादू नाही तर येत्या काही महिन्यातच टिकणारे आरक्षण देणार असेही पाटील म्हणाले.आरक्षणाबाबत काही लोक दिशाभूल करीत आहेत. परंतु माझ्या खिशातील तीन कार्ड काढल्यास विरोधकांसाठी २०१९ ची निवडणूक संपेल, अशी टीकाही महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केली. मराठा विद्यार्थ्यांनी १०० टक्के फी भरली असेल त्यांची ५० टक्के फी परत देणार असून उद्याच्या कॅबिनेटमध्ये याबाबतचा जीआर काढणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. राज्यभरात जिल्ह्याच्या ठिकाणी आणखी काही वसतिगृहे उभारणार असल्याचेही पाटील म्हणाले.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता सांगलीत वसतिगृह सुरु करण्यात आलंय. सांगली- मिरज रोडवरील शिवाजीनगर, जिल्हा क्रीडा संकुल येथे हे वसतिगृह सुरू करण्यात आलंय. एकूण ७० मुलांची निवासाची सोय या वसतिगृहात करण्यात आली आहे. या वसतिगृहाचे उद्घाटन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकात दादा पाटील यांच्या हस्ते पार पडले.राज्यातील सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने सुसज्ज वसतिगृहे उभारण्यात येत आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्यात उभारलेले हे पहिले वसतिगृह आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्यात येणार आहे का? असा प्रश्न विचारला असता पाटील यांनी यावर बोलण्यास नकार देत विषय टाळला.VIDEO : दुसरं लग्न करणाऱ्या पतीला पत्नीने आणि मुलांनी भररस्त्यावर धुतलं

Trending Now