चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने का होतात वाद? ही आहेत त्यांची वादग्रस्त वक्तव्य

पण राजकारणाच्या पाण्याची तऱ्हाच काही वेगळी असते. अमित शहांच्या खास विश्वासातले दादा मंत्रिमंडळात आले आणि क्रमांक दोनचे मंत्रीही बनले आणि आपणही कसलेले राजकारणी आहोत हे दादांनी दाखवून दिलं.

मुंबई,ता.17 जुलै : चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले क्रमांक दोनचे मंत्री. मितभाषी, कुणाच्या अध्यात-मध्यात नसणारे. आयुष्याचा मोठा काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि विद्यार्थी परिषदेत गेलेला. त्यामुळं राजकारण्यांची गेंड्यांची कातडी दादांना कधी आली नव्हती. दादा प्रकाशझोतात आले तेव्हा ते राजकारणात कसे फिट बसतील? असा प्रश्न विचारला जावू लागला. नैतिकता वगैरे गोष्टी इतर संघटनेत ठिक असतात राजकारणात त्याचं काही चालत नाही हे दादांना त्यावेळी ऐकवलं जावू लागलं. आपल्या वक्तव्यांमुळं वाद झाला तर त्याचा विपर्यास केला गेला, आपण असे बोललोच नाही, विरोधकांचा कट होता ही खास राजकारण्यांची स्टाईल दादांना तोपर्यंत माहित नव्हती.पण राजकारणाच्या पाण्याची तऱ्हाच काही वेगळी असते. अमित शहांच्या खास विश्वासातले दादा मंत्रिमंडळात आले आणि क्रमांक दोनचे मंत्रीही बनले आणि आपणही कसलेले राजकारणी आहोत हे दादांनी दाखवून दिलं.

'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते बेभान, ट्रकचालकासह ट्रक पेटवला

पार्टी विथ डिफरन्स असं भाजपचे नेते म्हणतात पण भाजप हे काही भजनी मंडळ नाही हे दादांनी मोकळेपणाने सांगून टाकलं. मराठा आरक्षणाचा विषय असो की खड्ड्यांचा, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आयारामांचा की दुधाच्या आंदोलनाचा दादांच्या वक्तव्यांनी अनेकदा वाद निर्माण केले. पण दादांचा दबदबा मोठा असल्याने परिस्थिती हाताबाहेर कधी गेली नाही आणि दादांनीही मनाचा मोठेपणा दाखवत दिलगीरी व्यक्त करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

दमदार पावसाने उडवली पुणेकरांची दाणादाण!

जखमींची विचारपूस करताना पंतप्रधानांच्या डोळ्यात पाणी

दादांची 'दादागिरी' दाखवणारी वक्तव्य - 

Trending Now