कर्जमाफीत नाव असूनसुद्धा कर्जमाफी न झाल्याने शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

त्यांच्या पश्चात असलेला ३ वर्षांचा एकुलता एक मुलगा पोरका झाला

बुलडाणा, ०७ सप्टेंबर- बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील शेतकरी दाम्पत्य रमेश सावळे आणि विद्या सावळे यांनी कर्जमाफी यादीत नाव असूनही अद्याप कर्जमाफी न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. नैराश्यग्रस्त होऊन त्यांनी हे पाऊल उचलले. मोताळा गावात त्यांची ३ एकर शेती आहे. त्यांच्यावर बँकेचे कर्ज असल्याने ते नेहमी तणावात होते. सरकारकडून कर्जमाफी देण्यात दिरंगाई होत असल्यामुळे त्यांनी घराशेजारील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या टोकाच्या पाऊलामुळे त्यांच्या पश्चात असलेला ३ वर्षांचा एकुलता एक मुलगा पोरका झाला. दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे गावात शोककळा पसरली आहे.दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सरकारी कारभार किती निगरगट्ट असतो याची प्रचिती देणारी बाब समोर आली. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना अपात्र ठरताना सरकारी बाबूंनी लावलेले निकष चक्रावून टाकणारे तर आहेतच शिवाय संतापजनकही आहेत. राज्यात 1 मार्च ते 30 मे या तीन महिन्यात 639 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यातील केवळ 188 शेतकरी पात्र ठरले असून 140 शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. 122 शेतकरी अपात्र घोषित करण्यात आले असून 329 शेतकऱ्याच्या आत्महत्येची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.सरकारी दप्तरीही मृत शेतकऱ्यांची क्रुर थट्टा

1) मुख्यमंत्री यांनी दत्तक घेतलेल्या साळवेश्वरमध्ये माधव रावते यांनी चिता रचून आत्महत्या केली.- शासन दप्तरी नोंद - माधव रावते कापसाच्या कांड्यांच्या ढिगाऱ्यावर बसून बिडी पित होते, यातून ठिणगी पडून रावतेचा मृत्यू2) बोथबोधन येथे नांगरणीचे पैसे नाकारल्याने सुंदरी चव्हाण यांनी पेटवून घेऊन आत्महत्या केली.शासन दप्तरी नोंद -- सुंदरी बाई मुलाकडे आले असता झोपेत असताना अंगावर दिवा पडून मृत्यू3) राजूरवाडी येथे शंकर चावरे याने पंतप्रधान याना जबाबदार धरत आत्महत्या केलीशासन दरबारी नोंद- अशा प्रकारची कुठलीही नोंद नाही,  चावरे यांनी आधी विष प्रश्न केले, नंतर फाशी घेतली पण दोर तुटला, मग रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला.VIDEO : भद्रावतीच्या बसस्टॅण्ड जवळ वाघाचं दर्शन, वन विभागाचा शोध सुरू

Trending Now