चाळीसगावचा नरभक्षक बिबट्या मालेगावात, 7 वर्षांच्या चिमुरड्याचा घेतला जीव

चाळीसगावमध्ये सहा जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्यानं सातवा बळी घेतलाय.

Sachin Salve
जळगाव, 07 डिसेंबर : चाळीसगावमध्ये सहा जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्यानं सातवा बळी घेतलाय. मालेगाव तालुक्यामध्ये काल रात्री या बिबट्यानं एका ७ वर्षांच्या मुलाचा बळी घेतला. कुणाल प्रकाश अहिरे असं या चिमुकल्याचं नाव आहे.चाळीसगाव तब्बल सहा जणांच्या बळी घेणार्‍या नरभक्षक बिबट्या वनविभागाच्या रडारवर असतानाच आणि बंदोबस्तासाठी शार्पशुटर मागवले असतानाच बुधवारी रात्री नरभक्षक बिबट्याने चाळीसगाव तालुक्याची हद्द सोडून मालेगाव तालुक्यात प्रवेश करीत साकुर-देवघट रस्त्यालगतच्या रतन शंकर बागूल यांच्या शेतातील सात वर्षीय कुणाल प्रकाश अहिरे या बालकाचा बळी घेतल्याची घटना बुधवारी रात्री 9.50 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.या नरभक्षक बिबट्याच्या मागावर विभागाने हैद्राबाद रेस्क्यू वाईल्ड लाईफ एनजीओ संस्थेचे सदस्य आणि देशातील प्रमुख दहा शार्प शुटरपैकी एक असलेल्या नवाब शफहातअली खान यांना पाचारण केले असतानाच बिबट्याने सातवा बळी घेतला. विशेष म्हणजे बिबट्याने धूम आता मालेगाव तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करीत उसाच्या शेतातील कुणाल प्रकाश अहिरे या सात वर्षांच्या बालकाचा बळी गेला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बालकाची धडावेगळी मान झाली होती .

या घटनेने जमाव प्रक्षुब्ध झाला असून वनविभागाच्या कारभाराविरुद्ध तीव्र रोष व्यक्त करीत जमावाने स्वतःच बिबट्याला ठार मारण्यासाठी सक्षम असल्याचे सांगत तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेनंतर प्रांताधिकारी, तहसीलदार आणि वनविभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बालकाचा बळी घेणारा हा तोच बिबट्या की अन्य दुसरा बिबट्या नरभक्षक झाला? याबाबतदेखील तर्क-वितर्क व्यक्त होत आहे तर बिबट्याने चाळीसगाव तालुक्याची हद्द ओलांडून मालेगाव तालुका गाठला असावा ? अशीदेखील चर्चा आहे.बिबट्याने सात जणांचा बळी घेतल्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रथमच घटना असल्याचे बोलले जात आहे

Trending Now