VIDEO : सांगलीत पार पडल्या होड्यांच्या रोमहर्षक शर्यती
सांगलीच्या कृष्णा नदीत रविवारी होड्यांच्या रोमहर्षक शर्यती पार पडल्या. आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी सांगलीकरांनी कृष्णा नदीच्या काठावर मोठी गर्दी केली होती.
ram deshpande
सांगली, 13 ऑगस्ट : सांगलीच्या कृष्णा नदीत रविवारी होड्यांच्या रोमहर्षक शर्यती पार पडल्या. आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी सांगलीकरांनी कृष्णा नदीच्या काठावर मोठी गर्दी केली होती. फ्रेंड्स युथ ग्रुप आणि रणसंग्राम मंडळाच्या वतीने आयोजिक करण्यात आलेल्या या स्पर्धेत सांगलीवाडीच्या रॉयल कृष्णा बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावला. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 13 स्पर्धक संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.सांगलीवाडीच्या शंकर घाटावरून या होड्यांच्या शर्यतीला प्रारंभ झाला. तीन फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा पार पडली. या शर्यतीत सुरुवातीला १० व्या क्रमांकावर असलेला सांगलीवाडीचा 'तरुण मराठा बोट क्लब' आणि 'तरुण रॉयल कृष्णा बोट क्लब' यांच्यात प्रथम क्रमांकासाठी अत्यंत चुरस पाहायला मिळाली. अखेर सांघिक कामगिरीच्या जोरावर आणि पाण्याच्या प्रवाहाचे आव्हान भेदत 'तरुण रॉयल कृष्णा बोट क्लब'ने प्रथम क्रमांक पटकावला.या स्पर्धेत पंचक्रोशीतील सांगलीवाडी, कसबे डिग्रज, कवठे पिरान, समडोळी या गावांतील 13 स्पर्धक संघ सहभागी झाले होते. केवळ पश्चिम महाराष्टात
फ्रेंड्स युथ ग्रुप, रणसंग्राम मंडळ आणि श्री केशवनाथ उत्सव मंडळाच्या वतीने आयोजिक करण्यात आलेल्या या स्पर्धेत सांगलीवाडीच्या रॉयल कृष्णा बोट क्लब ने प्रथम क्रमांक, तर सांगलीवाडीच्याच मराठा बोट क्लबने द्वितीय क्रमांक पटकावला. कसबे डीग्रजच्या श्री जी बोट क्लबने तृतीय क्रमांक मिळवला.